
पाकनं केलेले ड्रोन हल्ले भारतानं हाणून पाडले. पाक मिसाईलला भारताच्या क्षेपणास्त्र प्रणालीनं उद्धवस्त करून टाकलं. तरीही पाककडून फेक नॅरेटिव्ह पसरवलं जातंय. मात्र आता या फेक नॅरेटिव्हला भारतीय सैन्यानं चोख प्रत्युत्तर दिले आहे. ते कसे पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.
सातत्यानं बॅकफूटला जावं लागत असलं तरी पाकिस्तानची खुमखुमी मात्र कमी होत नाही. प्रत्यक्ष युध्दात आपण तग धरू शकणार नाही हे माहीत असल्यांनच आता त्यांनी फेक नॅरेटीव्ह सुरू केलं आहे. सोशल मीडिया आणि विविध माध्यमातून पाकिस्तान आणि चीनकडून खोट्या बातम्या पसरवत आहे. याचाच एक भाग म्हणजे पाकिस्तानला पळता भुई थोडी करणाऱ्या भारताची S400 मिसाईल सिस्टम उद्धवस्त केल्याचं हास्यास्पद विधान केलं आहे.
एव्हढचं नाही तर पाककडून ब्रम्ह्मोस मिसाईल अपयशी झाल्याची माहिती देणारं DRDO चे शास्त्रज्ञ ए.एस. कुमार यांनी स्वाक्षरी केलेलं पत्र सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आलं. अर्थात हे पत्रही बनावट आहे.
पाककडून भारतावर केलेल्या हल्ल्यात भारताचं कमी नुकसान झाल्याचं खुद्द परराष्ट्र सचिवानीचं सांगितलयं. मात्र पाकच्या नापाक कारवाया अद्याप थांबलेल्या नाहीत. पश्चिम सीमेवर पाकिस्तानी सैन्याची संख्या वाढवली जात आहे. त्यामुळे पाकचे मनसुबे भारतावर हल्ला करून युद्धजन्य परिस्थिती निर्माण करण्याची आहे.
युद्धभूमीवर जिंकता येत नाही. त्यावेळी जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जातो. यावेळी पाकिस्तान बँकफुटला जाऊन सोशल मीडियाचा हत्यारासारखा वापर करतोय. आणि त्याला चीन साथ देतयं. मात्र सोशल मीडियावरील फेक नॅरेटिव्हला भारतानं चोख प्रत्युत्तर दिलय. सोशल मीडियावरील पाकच्या पोकळ वल्गनांना केराची टोपली दाखवलीय. आतातरी पाक चिन्यांच्या मदतीनं असल्या भेकड हरकती करणार नाही, अशी एपेक्षा आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.