वृत्तसंस्था: जम्मू- काश्मीर येथील शोपियानमध्ये (Shopian) भारतीय सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये (terrorists) चकमक झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यावेळी २ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात भारतीय (Indian) जवानांना यश आले आहे. ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा देखील जप्त करण्यात आला आहे. सुरक्षा दल शोपियान परिसरामध्ये शोध मोहीम राबवत होते. यावेळी लपलेल्या दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला आहे. (Indian troops kill 2 terrorists Shopian encounter)
हे देखील पहा-
सुरक्षा दलांनी देखील त्याला चोख प्रत्युत्तर देत २ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुरक्षा दल जेव्हा परिसरामध्ये शोध मोहीम राबवत होते. तेव्हा तिथे लपलेल्या दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार (Firing) करण्यात आला आहे. सुरक्षा दलांनी देखील त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. यावेळी झालेल्या चकमकीमध्ये २ दहशतवादी मारले गेले आहेत. मारले गेलेल्या दहशतवाद्यांची अद्याप ओळख पटली नाही. ते कोणत्या गटाशी संबंधित आहेत. हे देखील समजू शकले नाही.
विशेष म्हणजे, गुरुवारी सुरक्षा दलाने जम्मू- काश्मीर मधील बारामुल्ला (Baramulla) आणि शोपियान जिल्ह्यातून लष्कर- ए- तैयबाच्या या दहशतवादी संघटेनेशी संबंधीत असणाऱ्या ४ साथीदारांना अटक (Arrested) करण्यात आली होती. दरम्यान, दहशतवादी गट बारामुल्लाच्या मुख्य भागात पोलीस (Police) आणि इतर सुरक्षा दलांविरुद्ध शांतता आणि कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याकरिता अवैध शस्त्रे आणि दारूगोळा वापरत असल्याची विश्वसनीय सूत्रांकडून पोलिसांना माहिती मिळाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी शोध मोहिम सुरू करण्यात आली आहे. याकरिता सुरक्षा दलाने जेहानपोरा- खदनियार लिंक रोडबरोबरच अनेक ठिकाणी नाकेबंदी करण्यात आली होती. तपासादरम्यान जेहानपोराच्या बाजूने एका स्कूटीवर २ लोक दिसले होते. जे संशयास्पद वाटत होते. नाकाबंदी बघून त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु, सतर्क पोलिसांच्या पथकाने दोघांना देखील पकडले आहे. त्यांच्याकडून झडती घेतली असता त्यांच्याकडून एके-४७ रायफलच्या ४० राउंड जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
Edited By- Digambar Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.