Indian Railway : रेल्वेच्या 'या' सेवेमुळे रात्रीच्या प्रवासात निवांत झोपा; काय मिळेल सुविधा?

'डेस्टिनेशन अलर्ट वेक अप अलार्म' असे रेल्वेने सुरू केलेल्या या सुविधेचे नाव आहे.
indian railway
indian railwaysaam tv

मुंबई : रेल्वे प्रवास (Travel) अत्यंत सुरक्षित आणि कमी खर्चाचा प्रवास मानला जातो. मात्र रात्रीच्या वेळी रेल्वेने लांब पल्ल्याच्या प्रवास करताना वेळेत जाग आली नाही तर मोठी अडचण होते. वेळेत झोपेतून न उठल्यास आपल्या निश्चित रेल्वे स्टेशनवर उतरण्याऐवजी पुढे निघून जातो. प्रवाशांची हीच अडचण ओळखून रेल्वेने एक चांगली सेवा सुरु केली आहे. यामुळे रेल्वे प्रवासात तुम्ही निवांत झोपू शकता.

रेल्वेने (Indian Railway) सुरू केलेल्या या सुविधेमुळे तुम्ही ठरलेल्या स्टेशनवर येण्यापूर्वी 20 मिनिटे आधी जागे व्हाल. यामुळे तुमचे स्टेशन चुकणार नाही आणि तुम्ही चांगली झोप देखील घेऊ शकाल.

indian railway
Tech News: सिमकार्ड घेताना 'ही' चूक करु नका; अन्यथा व्हॉट्सअ‍ॅप, टेलिग्राम वापरल्यास जाल तुरुंगात

'डेस्टिनेशन अलर्ट वेक अप अलार्म' असे रेल्वेने सुरू केलेल्या या सुविधेचे नाव आहे. अनेकवेळा रेल्वे बोर्डाकडे ट्रेन उशिरा आल्याच्या तक्रारी आल्या, त्यामुळे प्रवासी ट्रेनमध्येच झोपून राहतो आणि ज्या स्थानकावर त्याला उतरायचे होते तिथे उतरता येत नाही. अशा समस्येतून सुटका करण्यासाठी रेल्वेने नवीन सुविधा सुरू केली आहे. 139 क्रमांकाच्या चौकशी सेवेद्वारे ही सेवा घेता येईल. (Latest Marathi News )

indian railway
Viral Video: महिलेची नक्कल करत चार पायांवर थिरकली म्हैस; पाहा व्हिडीओ

किती शुल्क आकारले जाईल?

तुम्ही 139 क्रमांकाच्या सेवेवर अलर्टची सुविधा मागू शकता. रात्री 11 ते सकाळी 7 या वेळेत ही सुविधा उपलब्ध असेल. याचा फायदा कोणीही घेऊ शकतो. यामध्ये ट्रेन स्टेशनवर पोहोचण्याच्या 20 मिनिटे आधी तुम्हाला उठवले जाईल. यासाठी तुम्हाला फक्त तीन रुपये मोजावे लागतील.

ही सेवा कशी मिळवाल?

'डेस्टिनेशन अलर्ट वेकअप अलार्म' सुविधा सुरू करण्यासाठी, तुम्हाला IRCTC हेल्पलाइन 139 वर कॉल करणे आवश्यक आहे. भाषा निवडल्यानंतर, तुम्हाला डेस्टिनेशन अलर्टसाठी 7 आणि नंतर 2 नंबर दाबावा लागेल. त्यानंतर 10-अंकी PNR एंटर करा. कन्फर्ममेशनसाठी 1 डायल करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com