सावधान! तुम्हीही वापरता 'Google Chrome'? सरकारी एजन्सीकडून सावधानतेचा इशारा

सरकारी एजन्सीकडून महत्वाच्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
Google Chrome News
Google Chrome Newssaam tv
Published On

जर तुम्हीही गुगल क्रोमचे वापरकर्ते असाल तर आता तुम्हाला सावधान होण्याची गरज आहे. सरकारी एजन्सीकडून याबाबत सूचना जारी करण्यात आली आहे. गुगल क्रोमवर (Google Chrome) अपडेट झालेल्या डेटाचा फायदा हॅकर्स घेवू शकतात. याच्या माध्यमातून ते तुमच्या डिवाईसचा अॅक्सेसही घेवू शकतात. याबाबत सविस्तर माहिती खालिलप्रमाणे

Google Chrome News
Kidney Stones Problem: पोटात वारंवार दुखतंय? तुम्हाला मुतखडा झालायं असे वाटतंय का? जाणून घ्या त्याची लक्षणे

दैनंदिन जीवनात अविभाज्य घटक असलेला गुगल क्रोम प्रसिद्ध ब्राऊजर आहे. परंतु, आता गुगल क्रोमच्या वापरकर्त्यांसाठी सूचना जारी करण्यात आली आहे. भारत सरकारच्या एका एजन्सीकडून ही सूचना जारी करण्यात आली आहे. रिपोर्टनुसार, इंडियन, कंम्पूटर एमरजन्सी रिस्पॉन्स टीम (CERT-IN) ने वापरकर्त्यांना इशारा दिला आहे. ही सूचना Google Chrome डेस्कटॉप युजरसाठी जारी करण्यात आली आहे. यामध्ये काही त्रुटी आढळल्या आहेत. त्यामुळे हॅकर्स सहजरित्या तुमच्या कंप्युटरचा अॅक्सेस मिळवू शकतात.

त्यामुळे सायबर हल्लेखोर सिक्युरिटी रेस्ट्रिक्शनला बायपास करू शकतात. (CERT-IN) हे आयटी मंत्रालयाच्या अंतर्गत येते. अनेक कारणांमुळे या त्रुटी गुगल क्रोममध्ये आहेत, असं सायबर एजन्सीचं म्हणणं आहे. त्यामुळे हॅकर्स याचा फायदा घेवून टार्गेटेड सिस्टमवर क्रॉफ्टेड रिक्वेस्ट पाठवू शकतात. तसेच सायबर हल्लेखोर आर्टिबरी कोडचाही वापर करू शकतात. हल्लेखोर टार्गेटेड सिस्टमच्या सेक्युरिटी रेस्ट्रिक्शन्सला बायपासही करु शकतात.(CVE-2022-2856) ही त्रुटी खूप वेगानं पसरत आहे. परंतु, कंपनीला याबाबत माहिती मिळाल्यावर या त्रुटींना फिक्स केलं आहे.

Google Chrome News
Raju Srivastav Health Update : राजू श्रीवास्तवला भेटण्यास कोणालाही परवानगी नाही, कारण...

'असं राहा सावधान'

गुगल क्रोम वापरकर्त्यांना तातडीनं अॅपच्या लेटेस्ट व्हर्जनला अपडेट करण्याची गरज आहे. यासाठी तुम्हीही गुगल क्रोमच्या जुन्या डेस्कटॉप व्हर्जनचा वापर करू शकता. त्यामुळे सायबर हल्ल्याचा धोका टळू शकतो. CERT-In ने यापूर्वी Apple IOS, iPadOS आणि macOS मध्ये सापडलेल्या बग्ससाठीही सूचना दिली होती. हॅकर्स याचाही फायदा घेवू शकतात. या डिवाईसमध्ये असलेल्या त्रुटींमुळे रिमोट अटॅकर्स विशेषत:क्राफ्टेड फाईलला टार्गेटेड विक्टीमपासून ओपन करू शकतात. वापरकर्त्यांना या डिवाईसला तातडीनं अपडेट करण्याची आवश्यकता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com