चिनी सैनिकांच्या कुरापती सुरूच; अरुणाचल प्रदेश सीमेजवळ केलं मोठं बांधकाम

Arunachal pradesh border news : चीन-अरुणाचल प्रदेश सीमेजवळ चिनी सैनिकांचे अत्यंत जलद गतीने बांधकाम सुरु आहे.
indian army says China Building Infrastructure Near Arunachal Border
indian army says China Building Infrastructure Near Arunachal BorderSaam Tv
Published On

नवी दिल्ली : चीन-अरुणाचल प्रदेश सीमेजवळ (Arunachal Pradesh Border ) चिनी सैनिकांचे अत्यंत जलद गतीने बांधकाम सुरु आहे. चीनी (China) सैन्य सीमेजवळ आपली ताकद सातत्यानं वाढवत आहे. त्यामुळं सीमेजवळील कोणत्याही लाल संकटाचा सामना करण्यासाठी भारत कटीबद्ध आहे. सीमेवर भारतीय सैन्यही आपली ताकद वाढवत असून मूलभूत पायाभूत सुविधेवर काम सुरू आहे, असे प्रतिपादन भारतीय सैन्याचे पूर्व भागातील कमांडर लेप्टीनंट जनरल आर पी कालिता (R P Kalita) यांनी केले. (Arunachal pradesh border Latest news )

हे देखील पाहा -

आर पी कालिता म्हणाले, 'चिनी पोलीस हे अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर मूलभूत पायभूत सुविधा बनविण्याचे काम सुरू आहे. पुढे कलिता म्हणाले,'तिबेट क्षेत्रातील परिसरातही मूलभूत पायाभूत सुविधा तयार करण्याचं काम सुरू आहे. त्यांच्याकडून सातत्यानं रस्ते, रेल्वे आणि हवाई क्षेत्रातही या सुविधांवर जलद गतीने काम सुरू आहे', 'चिनी अधिकाऱ्यांनी सीमाभागात अनेक गावांची निर्मिती करण्यात येत आहे. त्याचा फायदा इतर उद्देशांसाठी केला जात आहे. आम्ही सतत त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवून आहे. आपणही सीमाभागात मूलभूत पायाभूत सुविधा विकसित करण्यावर भर देत आहे. त्याचा निश्चित फायदा भारतीय सैन्याला होईल. भारतीय सैन्याला मूलभूत पायाभूत सुविधा विकास करण्यामध्ये डोंगराळ भाग आणि खराब वातावरणाचा फटका बसत आहे, असे खुद्ध भारतीय सैन्याचे कमांडर यांनी मान्य केले आहे. मात्र, भारतीय सैन्य कोणत्याही संकटाचा सामना करण्यासाठी तयार आहे, असे आर पी कालिता यांनी सांगितले.

indian army says China Building Infrastructure Near Arunachal Border
काश्मिरी पंडितांना वाचवायच असेल तर 'काश्मिरी फाईल्स'वर बंदी घाला: फारूख अब्दुल्ला

दरम्यान, केंद्रीय सुरक्षा मंत्री राजनाथ सिंह यांनीही यावर भाष्य केलं आहे. राजनाथ सिंह म्हणाले, 'भारताच्या सीमेचे संरक्षण करणे सरकारचं प्राधान्य आहे. भारताच्या सीमा भागाचा विकास करणे हे सरकारच्या सुरक्षा धोरणाचा भाग आहे.

Edited By - Vishal Gangurde

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com