आजपासून जी२०चा शुभारंभ झाला. भारताच्या अध्यक्षतेखाली अफ्रिकन युनियनला जी-२० चा स्थायी सदस्य बनवण्यात आलंय. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सदस्य आणि पाहुणे म्हणून आलेल्या नेत्यांना संबोधित केलं. यावेळी पंतप्रधान मोदींच्या टेबलावर ठेवण्यात आलेल्या लाकडी फलकावर अनेकांच्या नजरा रोखल्या गेल्या. कारण या फलकावर नेहमी दिसणारं नाव नव्हतं. या फलकावर 'इंडिया'ऐवजी 'भारत' नाव लिहिण्यात आलं होतं.
देशाचं नाव बदलण्याच्या हालचालीला वेग आलाय. भाजप नेत्यांकडून एक्स (आधीचे ट्विटर) या सोशल मीडियावर पोस्ट करताना 'भारत' असा उल्लेख केला जात आहे. इतकेच नाही तर जी २० साठी आलेल्या प्रमुख पाहुण्यांना राष्ट्रपतीकडून भारत मंडपममध्ये आज रात्रीचं जेवण देण्यात येणार आहे. या जेवणाच्या कार्यक्रमासाठी देण्यात आलेलं निमंत्रण 'द प्रसिडेंट ऑफ भारत' या नावानं देण्यात आलंय.
तर काही दिवसांपूर्वी संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनीही देशाला 'भारत' म्हणावं, असा आग्रह केला होता. सर्व भारतीयांनी आपल्या देशाला 'इंडिया' न म्हणता 'भारत' म्हटलं पाहिजे. भाषा कुठलीही असली तरीही 'भारत' हेच नाव आपण सगळ्यांनी उच्चारलं पाहिजे, अशी आग्रही भूमिका मोहन भागवत यांनी घेतली होती.
दरम्यान या नावाच्या वादावरून देशातील राजकारण तापलंय. देशातील राजकीय पक्ष भारतीय जनता पक्षाचं सरकार देशाचं नावावर हल्ला करत आहेत. संविधानात अनुच्छेदात भारत जे इंडिया आहे, ते राज्यांच्या संघ आहे. यातील इंडिया शब्दाला हटवलं जातंय, असं काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी म्हटलंय. दरम्यान संविधानात इंडिया आणि भारत अशा दोन्ही नावांचा उल्लेख आहे, तर संवैधानिकपणे त्यावर कोणताच आक्षेप नसावा,असं काँग्रेस नेते शशी थरूर म्हणालेत.
जी२० शिखर परिषदेत भारत नावाचा वापर केला जात असल्यानं देशाचं नाव बदलण्याच्या चर्चेला जोर मिळत आहे. दरम्यान मोदी सरकार संसदेचं एक विशेष सत्र बोलवलं आहे. या सत्रात केंद्र सरकार 'इंडिया' हे नाव बदलून 'भारत' करण्याचं असं विधेयक मांडणार असल्याचा म्हटलं जात आहे.
देशाचं नाव बदलावरून संयुक्त राष्ट्राचे उप प्रवक्ते आणि संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटोनियो गुटेरेस म्हणाले की, जर आम्हाला इंडियाचं नाव 'भारत' करायची विनंती आली तर आम्ही त्यांचा विचार करू. या मुद्द्यावर युनायटेड नेशन्सच्या सरचिटणीसचे मुख्य प्रवक्ते स्टीफन दुजारिक म्हणाले, भारत जेव्हा नाव बदलण्याची औपचारिकता पूर्ण करेल. तसेच भारत आम्हाला त्याची माहिती देईल, तेव्हा आम्ही यूएन (रेकॉर्ड) मध्ये नाव बदलू.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.