Second Omicron Death: ओमिक्रॉनमुळे भारतात दुसरा मृत्यू; 55 वर्षीय महिलेने गमावला जीव

ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव देशात वेगाने वाढत आहे. आता देशात व्हेरियंटने दुसरा जीव घेतला आहे. ओडिशामधील बोलांगीरमध्ये 55 वर्षांच्या एका महिलेचा ओमिक्रॉनमुळं मृत्यू झाला आहे.
Second Omicron Death
Second Omicron DeathSaam TV
Published On

ओडिशा : ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव देशात वेगाने वाढत आहे. आता देशात या व्हेरियंटने दुसरा जीव घेतला आहे. ओडिशामधील बोलांगीरमध्ये 55 वर्षांच्या एका महिलेचा ओमिक्रॉनमुळं मृत्यू झाला आहे. यापूर्वी राजस्थानच्या उदयपूरमध्ये एका 73 वर्षांच्या वृद्धाचा ओमिक्रॉन व्हेरियंटमुळे मृत्यू झाला होता.

वृत्तानुसार, 27 डिसेंबर ओडिशातील एका 55 वर्षीय महिलेला ब्रेन स्ट्रोकमुळे आपला जीव गमवावा लागला. त्यानंतर चाचण्यांनंतर, डॉक्टरांना आढळले की महिला देखील Omicron पॉझिटिव्ह आहे. परंतु, मिळालेल्या माहितीनुसार, महिलेला ओमिक्रॉनची (Omicron) लागण झाली होती. त्यामुळेच या महिलेचा मृत्यू झाला आहे. (Latest News on Omicron Death in India)

Second Omicron Death
Jammu Kashmir: सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये मोठी चकमक; 3 दहशतवादी ठार

अगलपूर गावात राहणाऱ्या या कोणतीही विदेश प्रवास केलेला नव्हता. गेल्या महिन्यात या महिलेला स्ट्रोक झाला होता. ज्यानंतर उपचारानंतर त्यांना 20 डिसेंबर रोजी बालांगीरच्या भीमा भोई वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अहवालानुसार, तिच्या नमुन्यांच्या जीनोम सिक्वेन्सिंग (Genome Sequencing) नंतर महिलेला ओमिक्रॉनची लागण झाल्याचे आढळून आले, असे बालंगीर जिल्हा प्रशासनाने सांगितले.

हे देखील पहा-

डॉक्टरांनी सांगितले की तिचे स्वॅबचे नमुने 22 डिसेंबर 2021 रोजी VIMSAR अधिकार्‍यांनी गोळा केले आणि तपासणीसाठी पाठवले होते. जिथे त्यांची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली होती. नंतर, या महिलेचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवले गेले. तेव्हा ती महिला ओमिक्रॉन संक्रमित आहे याची पुष्टी झाली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com