चिंता वाढली, 24 तासात देशात 6,984 नवीन कोरोना रुग्ण, ओमिक्रॉनची रुग्ण संख्याही 58 वर

गेल्या 24 तासात भारतात तब्बल 6,984 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. जे कालच्या प्रकरणांपेक्षा 20.7 टक्के जास्त आहे.
24 तासात देशात 6,984 नवीन कोरोना रुग्ण
24 तासात देशात 6,984 नवीन कोरोना रुग्णSaam Tv

नवी दिल्ली : कोरोना विषाणूचा (Corona Virus) धोका कुठेतरी कमी झालेला वाटत असताना मात्र आता कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉन (Corona Virus Omicron) संपूर्ण जगात धुमाकूळ घालत आहे. तो आता भारतातही येऊन पोहोचला आहे. त्यातच कोरोना रुग्णांचं प्रमाणही वाढत चाललं आहे. त्यामुळे चिंतेत वाढ झाली आहे. - India reports 6,984 new corona cases in 24 hours

24 तासात भारतात 6,984 नवीन कोरोना रुग्ण

गेल्या 24 तासात भारतात तब्बल 6,984 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. जे कालच्या प्रकरणांपेक्षा 20.7 टक्के जास्त आहे. मंगळवारी देशात 5,784 नवीन प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. ही प्रकरणे गेल्या 571 दिवसातील एका दिवसात नोंदवलेली सर्वात कमी कोरोना प्रकरणे आहेत. त्याच वेळी, आज 8,168 लोक कोरोनापासून बरे झाले आहेत.

24 तासात देशात 6,984 नवीन कोरोना रुग्ण
लंडनहून धुळ्यात आलेल्‍या महिला डॉक्‍टर कोरोना पॉझिटीव्‍ह; ओमायक्रॉनची तपासणी

त्यानंतर कोरोनामधून बरे होणाऱ्यांची एकूण संख्या 3,41,46,931 झाली आहे. गेल्या 24 तासात 247 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. एकूण मृतांचा आकडा 4,76,135 वर पोहोचला आहे. जर आपण लसीकरणाबद्दल बोललो, तर एकूण 1,34,61,14,483 लोकांचं लसीकरण करण्यात आले आहे.

भारतात सध्या 87,562 कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. सक्रिय प्रकरणे एकूण प्रकरणांपैकी 1 टक्क्यांपेक्षा कमी आहेत. हा दर सध्या 0.25% आहे, जो मार्च 2020 नंतरचा सर्वात कमी आहे. बरे होण्याचा दर 98.38% आहे, जो मार्च 2020 नंतरचा सर्वोच्च आहे. दैनिक पॉझिटीव्हीटी दर 0.59% आहे, जो गेल्या 72 दिवसांपासून 2% च्या खाली राहिला आहे. त्याचवेळी, साप्ताहिक सकारात्मकता दर 0.67% आहे, जो गेल्या 31 दिवसांपासून 1% च्या खाली आहे.

ओमिक्रॉनने 77 देशांमध्ये पाय पसरले

कोरोनाचा नवीन व्हेरिएंट ओमिक्रॉननेही आता वेगाने पाय पसरण्यास सुरुवात केली आहे. डब्ल्यूएचओने दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी कोणत्याही व्हेरिएंटला इतक्या वेगाने पसरलेले पाहिले नाही. ओमिक्रॉन व्हेरिएंट हा बहुतेक देशांमध्ये पसरलेला असू शकतो. आतापर्यंत 77 देशांमध्ये ओमिक्रॉनच्या केसेस नोंदवल्या गेल्या आहेत.

देशात ओमिक्रॉन व्हेरिएंट मोठ्या प्रमाणात पसरतो आहे. तेलंगणातील हैदराबादमध्ये ओमिक्रॉनचे आणखी दोन रुग्ण आढळून आल्याने खळबळ माजली आहे. त्यामुळे आता देशातील ओमिक्रॉन रुग्णांची संख्या ही 58 वर पोहोचली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com