Budget 2023
Budget 2023 SAAM TV

Budget Update 2023: अर्थसंकल्पातून रेल्वेला जबरदस्त बुस्टर! निर्मला सीतारामन यांची मोठी घोषणा

मोदी सरकार आज २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी आपला शेवटचा पूर्ण केंद्रीय अर्थसंकल्प सादर करत आहे.
Published on

Union Budget 2023: मोदी सरकार आज २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी आपला शेवटचा पूर्ण केंद्रीय अर्थसंकल्प सादर करत आहे. हा अर्थसंकल्प येत्या काळात देशाची स्थिती आणि दिशा ठरवणार आहे. तसेच या अर्थसंकल्पातून मोदी सरकारी दिशा देखील ठरणार आहे. या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmla Sitharaman) यांनी मोठी घोषणा केली आहे.

Budget 2023
New Income Tax Slab Budget 2023 : मोदी सरकारचं मध्यमवर्गीयांना मोठं 'गिफ्ट'; ७ लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त

रेल्वेसाठी मोठी घोषणा...

मोदी सरकारने रेल्वेसाठी २ लाख ४० हजार कोटींची तरतूद केली आहे. आतापर्यंतची ही सर्वात मोठी तरतूद आहे. आतापर्यंत सर्वांधिक मोठी आर्थिक मदत आहे. २०१३-१४ च्या तुलनेतील ९ पट मदत केली आहे. तसेच ५० नवी विमानतळं उभारणार असल्याचे घोषणा देखील निर्माला सीतारामन यांनी केली आहे.

Budget 2023
Budget 2023 : अर्थसंकल्पीय भाषणातील ठळक मुद्दे, वाचा सविस्तर

अर्थमंत्र्यांनी केलेल्या घोषणेनुसार, रेल्वेच्या नव्या योजनांसाठी 75 हजार कोटी रुपये दिले जाणार आहेत. तसेच ट्रांसपोर्ट इंफ़्रासाठी 75000 कोटींची गुंतवणूक करण्यात येणार असल्याची माहिती निर्मला सीतारामण यांनी केली आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com