Uttar Pradesh News: अंत्यविधीची तयारी सुरू असताना मृत महिला जिवंत; विचित्र घटनेने गावकरी भयभीत

काही वेळाने अचानक महिला जिवंत असल्याचा फोन आला. या घटनेने गावात उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे.
Deoria Sadar Railway station Uttar Pradesh
Deoria Sadar Railway station Uttar PradeshSaam TV

Uttar Pradesh News: मृत्यू पावलेली व्यक्ती अचानक जिवंत झाली आणि सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला अशी दृश्य सहसा तुम्ही चित्रपटात किंवा एखाद्या हॉरर स्टोरीमध्ये पाहिली असतील. मात्र उत्तर प्रदेशमध्ये ही अचंबित करणारी घटना प्रत्यक्षात घडली आहे. उत्तर प्रदेशमधील एक महिला काही दिवसांपासून रुग्णालयात उपचार घेत होती. तिचे निधन झाल्याचे तिच्या घरच्यांना सांगण्यात आले. त्यामुळे कुटुंबियांनी टाहो फोडला आणि अंत्यविधीची तयारी सुरू केली. काही वेळाने अचानक महिला जिवंत असल्याचा फोन आला. या घटनेने गावात उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील देवरीया येथे हा विचित्र प्रकार घडला आहे. बेलवा बाजार गावात मीना देवी या ५५ वर्षीय महिला मृत पावल्यावर पुन्हा जिवंत झाल्याचे समजले आहे. मीना श्वसनाच्या आजाराने त्रस्त आहेत. सोमवारी त्यांना श्वास घेण्यासाठी जास्त त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांना नजीकच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले. काही दिवस तिथे उपचार करण्यात आले. मात्र प्रकृतित काही सुधारणा होत नसल्याने त्यांना गोरखपूर बीआरडी मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले.

Deoria Sadar Railway station Uttar Pradesh
Uttar Pradesh : टॉयलेट सीट चोरीच्या संशयावरून तरुणाला मारहाण ; UP मधील धक्कादायक घटना

उपचार सुरू असताना मीना यांचा त्रास वाढू लागला त्यामुळे त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले. शुक्रवारी डॉक्टरांनी त्यांना डिस्चार्ज दिला. यावेळी मीना यांचा मुलगा टिंकू त्यांना घरी नेण्यासाठी रुग्णालयात आला होता. आईसाठी (Mother) त्याने खाजगी रुग्णवाहिका बोलावली. घरी जाताना रस्त्यात त्याला जाणवले की, आपली आई श्वास घेत नाही. त्याला वाटले आई हे जग सोडून कायमची निघून गेली. त्याने रडत रडत घरी फोन करून आई गेल्याची माहिती सांगितली.

Deoria Sadar Railway station Uttar Pradesh
Uttar Pradesh : पोलिस अधिकारी लाच घेताना सापडला; CM योगींनी थेट हवालदार बनवलं, वाचा नेमकं काय घडलं?

त्यामुळे सर्व कुटुंबियांना अश्रू (Tears) अनावर झाले. मीना यांचे निधन झाल्याने गावकरी आणि कुटुंबियांनी त्यांच्या अंत्यविधिची तयारी केली. बांबू आणून सर्व तयारी सुरू केली होती. तितक्यात टिंकूचा फोन आला, आई जिवंत असल्याचे त्याने सांगितले. यामुळे कुटुंबीय थोडे चकीत झाले. तसेच गावकरी देखील विचारात पडले. टिंकूने पुन्हा एकदा मीना यांना रुग्णालयात दाखल केले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com