Corona Cases Today : देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 4194 नवेरुग्ण, 255 मृत्यू

देशामध्ये अजून देखील रोजच कोरोना विषाणूच्या 4 हजारपेक्षा जास्त रुग्णांची नोंद झाली
Corona Cases Today : देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 4194 नवेरुग्ण, 255 मृत्यू
Corona Cases Today : देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 4194 नवेरुग्ण, 255 मृत्यूSaam TV
Published On

वृत्तसंस्था: देशामध्ये अजून देखील रोजच कोरोना (Corona) विषाणूच्या ४ हजारपेक्षा जास्त रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासामध्ये देशात कोरोना (Corona) विषाणूचे ४ हजार १९४ नवीन रुग्ण आढळले आहेत. २५५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर गुरुवारी दिवसभरामध्ये कोरोनावर मात केलेल्या ६ हजार २०८ जणांना रुग्णालयामधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सक्रिय प्रकरणांची संख्या ४२ हजार २१९ इतकी कमी आहे. (In last 24 hours 4194 corona patients 255 died)

हे देखील पहा-

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Union Ministry Health) जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गुरुवारी दिवसभरामध्ये देशात ६ हजार २०८ लोक बरे झाले होते. देशामध्ये सक्रिय प्रकरणांची संख्या ४२ हजार २१९ वर आली आहे. कोरोना (Corona) विषाणूच्या साथीने जीव गमावणाऱ्यांची संख्या ५ लाख १५ हजार ७१४ वर पोहोचली आहे. मिळालेल्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत ४ कोटी २४ लाख २६ हजार ३२८ लोक संसर्गमुक्त झाले आहेत.

आतापर्यंत सुमारे १७९ कोटी डोस देण्यात आले आहेत. देशव्यापी लसीकरण (Vaccination) मोहिमेअंतर्गत आतापर्यंत १७९ कोटी कोरोना प्रतिबंधात्मक लसींचे डोस देण्यात आले आहेत. काल १६ लाख ७३ हजार ५१५ डोस देण्यात आले आहेत. यानंतर आतापर्यंत १७९ कोटी ७२ लाख ५१५ डोस लसीचे डोस देण्यात आले आहेत.

Corona Cases Today : देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 4194 नवेरुग्ण, 255 मृत्यू
Petrol Diesel Price: 5 राज्यातील विधानसभा निकालानंतर इंधनाचे नवे दर जाहीर

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आरोग्य कर्मचारी, कोरोना योद्धा आणि इतर आजारांनी ग्रस्त असलेल्या ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना २ कोटीपेक्षा जास्त प्रतिबंधात्मक लस देण्यात आले आहेत. देशामध्ये कोविड विरोधी लसीकरण मोहीम १६ जानेवारी २०२१ पासून सुरू झाली आणि पहिल्या टप्प्यामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात आले आहे. तर, कोरोना योद्धांसाठी लसीकरण मोहीम २ फेब्रुवारीपासून सुरू झाली.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com