BJP Meeting: भाजपची आज महत्वपूर्ण बैठक; मिशन 2024ची रणनिती ठरणार? कोणत्या विषयांवर होणार चर्चा?

बैठकीआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी पटेल चौक ते बैठकीच्या ठिकाणादरम्यान भव्य रोड शो करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
PM modi
PM modiSaam tv news
Published On

नवी दिल्ली : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणीची महत्त्वाची बैठक राजधानी दिल्ली येथे पार पडणार आहे. दोन दिवस ही बैठक चालणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थित होणाऱ्या या बैठकीत 35 केंद्रीय मंत्री, 12 राज्याचे मुख्यमंत्री, 37 राज्याचे आणि केंद्रशासित प्रदेशांचे अध्यक्ष या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

आजच्या या बैठकीत भाजपची मिशन 2024 ची रणनिती ठरणार असल्याचं बोललं जात आहे. आगामी विधानसभा निवडणुकांसाठी काय रणनिती असेल याबाबतही या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

PM modi
Solapur Siddheshwar Yatra: यावर्षी नैसर्गिक आपत्तीचे संकेत, सोलापुरातील श्री सिद्धेश्वर यात्रेतील भाकणुकीतील अंदाज

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भव्य रोड शो

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी पटेल चौक ते बैठकीच्या ठिकाणादरम्यान भव्य रोड शो करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या रोड शोदरम्यान विविध राज्याचे कलाकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वागत करतील. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते देखील या रोड शोसाठी उपस्थित राहणार आहेत. (Latest Marathi News)

बैठकीत काय होणार?

>> पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गुजरातच्या निवडणुकीतील अभिनंदनाचा प्रस्ताव.

>> जे पी नड्डा यांचा कार्यकाल वाढवला जाणार.

>> 2024 लोकसभा निवडणुकीची रणनिती ठरणार.

PM modi
IND vs SL 3rd ODI: भारताचा श्रीलंकेविरुद्ध ३१७ धावांनी विजय; वनडे इतिहासातील सर्वात मोठ्या विजयाची नोंद

>> 2023 मधील 10 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांवर होणार चर्चा.

>> त्रिपुरा, नागालँड, मेघालय, कर्नाटक, मिझोरम, छत्तीसगड, राजस्थान, मध्य प्रदेश, तेलंगणा आणि जम्मू-कश्मीर या राज्यात होणाऱ्या निवडणुकांवर मंथन.

>> निवडणुकीच्या दृष्टीकोणातून नेत्यांवर जबाबदारी दिली जाणार.

>> भाजपची ताकद नसलेल्या मतदारसंघासाठी रणनिती ठरणार.

>> जी 20 देशाचं नेतृत्व भारत करत आहे. त्या संदर्भात चर्चा होणार.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com