IMD Rain Alert! येत्या 24 तासात 'या' ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता

गेली तीन-चार दिवस उत्तर भारतात पाऊस होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा याठिकाणी पावसासाठी पोषक हवामान तयार होत असल्याचे IMD ने सांगितले आहे.
Rain
RainSaam Tv
Published On

पुणे: गेली तीन-चार दिवस उत्तर भारतात पाऊस होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा याठिकाणी पावसासाठी पोषक हवामान तयार होत असल्याचे IMD ने सांगितले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत उत्तर भारतात दोन वेस्टर्न डिस्टर्बन्सेस तयार होऊ शकतो. यामुळे तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून (IMD) वर्तवण्यात आली आहे. पण याचा महाराष्ट्रावर (Maharashtra) फारसा परिणाम होणार नसून तुरळक ठिकाणी किमान तापमानात घट होण्याची शक्यता सांगितली आहे. (IMD Rain Alert)

Rain
आजची पत्रकार परिषद म्हणजे 'खोदा पहाड निकला चुहा'- चंद्रकांत पाटील

सध्या दक्षिण तामिळनाडू (Tamilnadu) आणि दक्षिण केरळच्या (Kerala) किनारपट्टी परिसरात ईशान्यकडील वारे सक्रीय झाले आहेत. त्यामुळे पाच दिवस अंदमान आणि निकोबार बेटांवर (Andaman and Nicobar) विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता IMD कडून वर्तवण्यात आली आहे. तर येत्या 24 तासात अंदमान निकोबार बेटांवर तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

त्याचबरोबर आजपासून पुढील पाच दिवसात उत्तर भारतात (North India) दोन वेळा वेस्टर्न डिस्टर्बन्सेस तयार होण्याची शक्यता आहे. माहितीनुसार आज आणि उद्या पहिला वेस्टर्न डिस्टर्बन्स उत्तर भारतात (India) धडकणार आहे. तर 17 फेब्रुवारी रात्रीपासून 20 फेब्रुवारीपर्यंत दुसरा वेस्टर्न डिस्टर्बन्स याठिकाणी धडकणार आहे. दरम्यान पश्चिम हिमालय (Himalayas) या ठिकाणी तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळणार आहेत. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून याठिकाणी जोरदार पावसासह थंडी, दाट धुके आणि हिमवृष्टीचे वातावरण होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com