गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियाच्या चर्चेत असलेले आयएएस टीना दाबी आणि प्रदीप गावंडे आज विवाहबंधनात अडकणार आहेत. आयएएस टीना दाबीचे हे दुसरे लग्न असून पहिल्या पतीपासून घटस्फोट घेतल्यानंतर त्य आता दुसरे लग्न करत आहे. लग्नानंतर या जोडप्याचे रिसेप्शन 22 एप्रिलला ठेवण्यात आले आहे. डॉ. प्रदीप गावंडे हे महाराष्ट्राचे असून ते टीना यांच्यासोबत राजस्थानामध्ये (Rajasthan) सनदी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. टिना डाबी आणि प्रदीप गावंडे यांच्यात 13 वर्षांचा अंतर आहे. (Tina Dabi Marriage News Updates)
हे देखील पाहा -
जयपूरमधील 5-स्टार हॉटेलमध्ये लग्न
आयएएस टीना दाबी आणि प्रदीप गावंडे यांच्या लग्नाची जयपूरमधील पंचतारांकित हॉटेलमध्ये तयारी पूर्ण झाली आहे. या लग्नाला काही राजकीय व्यक्तींना देखील आमंत्रित करण्यात आले आहे. आयएएस टीना दाबी आणि प्रदीप गावंडे यांच्या लग्नासाठी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनाही आमंत्रित करण्यात आले आहे. .
डॉ. प्रदीप गावंडे यांचा जन्म 9 डिसेंबर 1980 ला झाला. ते सध्या राजस्थान सरकार मध्ये पुरातत्त्व विभागाचे संचालक आहेत. ते 2013 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी नागरी सेवेत येण्यापूर्वी वैद्यकीय शिक्षण घेतले आहे.
टीना डाबी कोण आहेत?
टीना डाबी 2016 च्या बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. सध्या त्या राजस्थानात कार्यरत आहेत. सिविल सर्व्हिसेसच्या परीक्षेत त्या भारतात प्रथम आल्या होत्या. त्याच वर्षीच्या परीक्षेत दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या अतहर आमीर यांच्याशी त्यांचे लग्न झाले होते.
मात्र हे नातं फार काळ टिकलं नाही. लग्नाची चर्चा झाली तशीच घटस्फोटाचीही चर्चा तितक्याच तीव्रतेने झाली. त्यानंतर त्या आता पुन्हा विवाहबंधनात अडकणार आहे.
Edited By - Shivani Tichkule
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.