Crime News: तो टोमणा जिव्हारी लागला अन्... कुऱ्हाडीने वार करत पत्नीची निर्घृण हत्या, दीड महिन्याच्या बाळालाही संपवलं

पत्नीने केलेली मस्करी पतीला न आवडल्याने त्याने थेट पत्नीची हत्या केलाची भयंकर घटना घडली आहे...
Hyderabad Crime News
Hyderabad Crime NewsSaam tv

Hyderabad News: दीड महिन्यापूर्वी जन्माला आलेल्या मुलाचा घरात आनंद असतानाच वादामध्ये पतीसोबत केलेली मस्करी महागात पडली आणि होत्याच नव्हत झालं. हैदराबादमधील (Hyderabad) अब्दुल्लापुरममध्ये ही घटना घडलीये. पत्नीकडून होत असलेल्या एका विधानानंतर संतापलेल्या पतीने कुऱ्हाडीने पत्नीचे तुकडे केले. तो इतक्यावरच थांबला नाही, तर त्याने दीड महिन्याच्या बाळालाही संपवलं. या घटनेने सर्वत्र खळबळ माजली आहे.

Hyderabad Crime News
Farmers Long March: लाल वादळ शमलं! सरकारच्या आश्वसनानंतर शेतकऱ्यांच्या लॉन्ग मार्च स्थगित

याबाबत अधिक माहिती अशी की, धनराज आणि लावण्या नावाचे हे पती-पत्नी मजुरी करायचे. आणि मागील काही दिवसांपासून दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले होते. त्यामुळे ती तिच्या माहेरी गेली होती. धनराज त्याच्या पत्नीवर रागवण्याचे कारण म्हणजे ती त्याला वारंवार हे मुल तुझ नाही, म्हणत चिडवत होती. तिच्या या टोमण्यामुळेच धनराज तिच्यावर प्रचंड संतापला होता.

याच रागाच्या भरात पती धनराजने आधी पत्नी लावण्यावर बिअर बॉटलने हल्ला केला. त्यानंतर कुऱ्हाडीने वार केले. तो इतक्यावरच थांबला नाही, तर त्याने दीड महिन्याच्या बाळालाही संपवलं. हे हत्याकांड दुपारी 1.30 वाजता घडलं. आरोपी धनराज हत्या करून फरार झाला, मात्र पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत लगेच त्याला अटक केली. त्याच्याजवळ रक्ताने माखलेले कपडे पोलिसांना मिळाले.

Hyderabad Crime News
Viral Photoshoot: अहो आश्चर्यचं! लेकीसह आई, सासू, आजीही प्रेग्नंट, नेटकरीही चक्रावले; PHOTO तुफान VIRAL

पोलिसांनी सांगितलं की, या घटनेमुळे गावात प्रचंड खळबळ उडाली आहे. ज्यादिवशी घटना घडली त्यादिवशी या दाम्पत्याच्या मोठ्या मुलीने आईला मारहाण करताना बघितलं. त्यानंतर ती मदतीसाठी आरडाओरड करू लागली. जेव्हा आजूबाजूचे लोक गोळा झाले, तोपर्यंत धनराज घरातून फरार झाला होता. दरम्यान, आरोपीविरुद्ध हुंडा प्रतिबंधक कायद्यातील कलमान्वयेही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com