Human Barbie Doll : युक्रेनच्या व्हॅलेरियाची जगभर चर्चा; तरूणी बनली बार्बी डॉल, वाचा स्पेशल रिपोर्ट

Real life Barbie : बहुतांश लहान मुलींना डॉल अर्थात बाहुलीसोबत खेळायला आवडतं..तस पाहिलं तर बाहुली म्हणजे निर्जिव खेळणं मात्र युक्रेनमध्ये एक अशी तरूणी आहे जिनं स्वत:ला डॉलसारखं बनवलंय. म्हणूनच तिला मानवी बार्बी डॉल असंही म्हंटलं जातं. कशी आहे ही सजीव बाहुली...चला पाहूयात...
Barbie doll
Real life Barbie Saam tv
Published On

सुप्रीम मस्कर, साम टीव्ही

लहान मुलांना खेळणी खेळायला आवडतात. प्रत्येकाच्या खेळण्यात बाहुली असतेच..विशेष करून लहान मुलींना बाहुल्यांची जास्तच आवड असते. मात्र युक्रेनमध्ये चक्क एक तरूणीच बाहुली बनलीय. आपला लूक डॉलसारखा दिसावा यासाठी तिनं स्वत:वर शस्त्रक्रियाही करून घेतलीय. या तरूणीचं नाव आहे. व्हॅलेरिया लुक्यानोव्हा...तिला मानवी बार्बी डॉल म्हणूनही ओळखलं जातं.

युक्रेनियन मॉडेल व्हॅलेरिया सध्या मॉस्कोमध्ये राहते आणि तिच्या बार्बी डॉलसारख्या दिसण्यामुळे ती जगभरात चर्चेत आलीय. त्यासाठी व्हॅलेरियानं ब्रेस्ट इम्प्लांट केले आहेत. मात्र तिच्या शरीराचा उर्वरित भाग नैसर्गिक असून, दररोज व्यायाम आणि विशिष्ट आहारामुळे घेते..व्हॅलेरियाचं वय 39 वर्ष आहे.

Barbie doll
Pune Crime : नवऱ्याकडून ५ कोटी पोटगी मिळाली, दुसरं लग्न करायला निघाली; पण साडेतीन कोटी गमावले, नेमकं काय घडलं?

वयाच्या 16 व्या वर्षापासून 2014 पर्यंत ती युक्रेनमधील ओडेसा इथं राहत होती, त्यानंतर ती मॉस्कोला स्थायिक झालीय. 2007 मध्ये तिने मिस डायमंड क्राऊन ऑफ द वर्ल्ड ही आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धा जिंकली होती. या स्पर्धेत सुमारे 300 स्पर्धक होते आणि विशेष म्हणजे, यात प्लास्टिक सर्जरी किंवा बॉडी मॉडिफिकेशनला मनाई नव्हती.

Barbie doll
live in relationship : ब्रेकअपनंतर मुलींना लग्नासाठी अनेक अडचणी येतात; हायकोर्टाची महत्वाची टिप्पणी

सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर व्हॅलेरिया तिच्या बार्बी डॉलसारख्या दिसण्यामुळे प्रसिद्ध झाली. रशियाबाहेरील माध्यमांमध्ये तिची पहिली दखल जेझेबेल ब्लॉगवर घेण्यात आली, त्यानंतर व्ही मासिकासाठी सेबॅस्टियन फाएनाने तिचं फोटोसेशन केलं.

Barbie doll
Mumbai Metro Line 5 Route : ठाणे- भिवंडी-कल्याण मेट्रोबाबत मोठी अपडेट; उल्हासनगरपर्यंतच्या लाखो प्रवांशाचा सुसाट प्रवास, कसा असेल मार्ग?

माध्यमांनी तिला जिवंत बार्बी डॉल अशी उपमा दिली आणि व्हॅलेरिया जगभरात प्रसिद्ध झालीय. व्हॅलेरिया लुक्यानोव्हानं तिचा बालपणीचा मित्र आणि युक्रेनियन उद्योगपती दिमित्री शक्राबोव्हशी लग्न केलय. मात्र तिला कौटुंबिक जिवनशैली नकोय. म्हणूनच मूल जन्माला घालण्यास तिचा विरोध आहे. आपलं वय कितीही वाढलं तरी आपण डॉलसारखंच दिसावं यासाठीच तिचा हा खटाटोप आहे. अर्थात व्हॅलेरियाचं राहणीमान आणि तिची जिवनशैली पाहता व्हॅलेरिया डॉलचा मान अखेरपर्यंत कायम ठेवेल अशी आशा करायला हरकत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com