गांधीजींच्या पुतळ्याला धरुन 'बापू-बापू' म्हणत रडले 'सपा'चे नेते; पाहा Video

हा व्हिडीओ समाजवादी पक्षाचे नेते गालिब खान यांचा आहे जे सध्या या व्हिडीओमुळे चर्चेत आहेत.
गांधीजींच्या पुतळ्याला धरुन 'बापू-बापू' म्हणत रडले 'सपा'चे नेते; पाहा Video
गांधीजींच्या पुतळ्याला धरुन 'बापू-बापू' म्हणत रडले 'सपा'चे नेते; पाहा VideoTwitter/@maro_attitude
Published On

नवी दिल्ली: आज देशभरात गांधी जयंती Mahatma Gandhi Jayanti साजरी होत आहे. या निमित्ताने सोशल मीडियावरील Social Media सर्व नेते महात्मा गांधींना ठिकठिकाणी श्रद्धांजली अर्पण करत आहेत. यादरम्यान, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओला शेअर करत लोक जोरदार कमेंट्सचा भडीमार करत आहेत. हा व्हिडीओ समाजवादी पक्षाचे Samajvadi Party नेते गालिब खान Galib Khan यांचा आहे जे सध्या या व्हिडीओमुळे चर्चेत आहेत. ते आपल्या समर्थकांसह गांधी जयंतीच्या दिवशी बापूंच्या पुतळ्याजवळ खूप भावूक झाले आहेत.

काय आहे या व्हिडिओमध्ये?

व्हिडिओ पाहिल्यावर दिसून येत आहे की, गालिब खान आपल्या समर्थकांसह महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर गेले आहेत आणि गांधीजींचा पुतळा पकडून त्यावर डोके ठेवून बापू-बापू म्हणत भावुक झाले आहेत. त्याचे समर्थक देखील या दरम्यान भावुक झालेले दिसत आहेत. ते त्यांना सांत्वन देताना दिसत आहेत. गालिब खानचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे आणि लोक तो व्हिडीओ जबरदस्त शेअर करत आहेत.

गांधीजींच्या पुतळ्याला धरुन 'बापू-बापू' म्हणत रडले 'सपा'चे नेते; पाहा Video
वा रं बहाद्दर! YouTube वर व्हिडिओ पाहून लुटलं ATM; घटना CCTV मध्ये कैद

व्हिडीओखाली कमेंट्सचा भडीमार;

हा व्हिडिओ उत्तर प्रदेशातील Uttar Pradesh संभल Sambhal जिल्ह्यातील आहे. हा व्हिडिओ शेअर करत असताना, लोक तीव्र प्रतिक्रिया देत आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले, 'ओव्हर अ‍ॅक्टिंग करू नका संपूर्ण खेळ बिघडेल.' त्याचवेळी दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले, 'बापूने आपल्या मुलाला इथेच का सोडले? .. व्हिडिओ ऑस्करसाठी पाठवला पाहिजे.' तर, आमिर खान नावाच्या वापरकर्त्याने लिहिले आहे, 'सपाचे नेते गालिब खान यांचा 50 रूपया कटेगा ओवर एक्टिंग करने का!

2019 मध्ये देखील संभल मधून असाच एक व्हिडिओ समोर आला होता;

अश्याच प्रकारे, 2019 मध्ये देखील संभल मधून असाच एक व्हिडिओ समोर आला होता जिथे गांधी जयंतीनिमित्त समाजवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष फिरोज खान Firoz Khan बापूंच्या आठवणीत रडताना दिसले होते. फिरोज खान यावेळी म्हणत होते, 'बापू तुम्ही कुठे गेलात. तुम्ही एवढा मोठा देश मुक्त केला आणि आम्हाला अनाथ बनवून सोडून गेलात.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com