Hijab ban: हिजाब बंदीवर लवकरच सुनावणी; सर्वोच्च न्यायालयाचे आश्वासन

न्यायालयाने आपण लवकरात लवकर सुनावणी घेऊ. असं आश्वासन दिलं आहे.
Hijab ban
Hijab ban Saam TV
Published On

शिवाजी काळे

Hijab ban : कर्नाटक हिजाब प्रकरणी सर्वोच्च न्यायालय लवकरच सुनावणी करणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या दोन न्यायाधीशांच्या खंडपीठाने कर्नाटक उच्च न्यायालयाच्या शैक्षणिक संस्थांवर बंदी घालण्याच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या विविध याचिकांवर सुनावणीनंतर दोन वेगवेगळे निर्णय दिले होते. त्यानंतर हे प्रकरण सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्याकडे गेले होते. (Latest Hijab ban News)

या संदर्भात पुन्हा एकदा लवकरात लवकर सुनावणी करण्याच्या मागणीसाठी आज वकील मीनाक्षी अरोडा सर्वोच्च न्यायालयासमोर उपस्थित झाल्या होत्या. यावर न्यायालयाने आपण लवकरात लवकर सुनावणी घेऊ. असं आश्वासन दिलं आहे.

वकील मीनाक्षी अरोडा यांनी मुस्लीम मुलींच्या परीक्षा आहेत. त्यामुळं तात्काळ सुनावणी घ्यावी अशी विनंती न्यायालयाला केली होती. या प्रकरणावर आता तीन न्यायाधीशांचं खंडपीठ सुनावणी करणार आहे.

काय आहे प्रकरण?

ऑक्टोबर 2022 मध्ये सर्वोच्च न्यायालयात हिजाबबंदीच्या सुनावणीनंतर निर्णय देताना विभाजीत निर्णय दिला होता. शैक्षणिक संस्थांमध्ये एखाद्या धर्माच्या व्यक्तीला धार्मिक प्रतीकांचा वापर करण्यास परवानगी देणे हे धर्मनिरपेक्षतेच्या अगदी उलट आहे, असा निकाल न्यायमूर्ती हेमंत गुप्ता यांनी दिला होता. तर आता शाळा-महाविद्यालयांमध्ये मुस्लीम मुलींनी हिजाब परिधान करणे हा त्यांच्या इच्छेचा प्रश्न आहे, असा निर्णय न्यायमूर्ती सुधांशू धुलिया यांनी दिला होता. कर्नाटक उच्च न्यायालयाने 15 मार्च 2022 ला शाळा कॉलेजमध्ये हिजाबबंदीचा निर्णय दिला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com