आंध्र प्रदेशात पावसाचा हाहा:कार; आतापर्यंत 33 जणांचा मृत्यू, अनेक रस्ते पाण्याखाली

राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे आतापर्यंत ३३ जणांना जीव गमवावा लागला
आंध्र प्रदेशात पावसाचा हाहा:कार; आतापर्यंत 33 जणांचा मृत्यू, अनेक रस्ते पाण्याखाली
आंध्र प्रदेशात पावसाचा हाहा:कार; आतापर्यंत 33 जणांचा मृत्यू, अनेक रस्ते पाण्याखाली Saam Tv
Published On

वृत्तसंस्था : बंगालच्या उपसागरात मोसमी उलथापालथीने आंध्र प्रदेश मधील परिस्थिती बिघडत चाली आहे. राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे आतापर्यंत ३३ जणांना जीव गमवावा लागला आहे, तर १२ जण बेपत्ता असल्याची माहिती मिळाली आहे. याशिवाय राज्यात रेल्वे संपर्कावर देखील मोठा परिणाम झाला आहे.

दक्षिण मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार की, नेल्लोरजवळ पडुगुपडू या ठिकाणी रेल्वे रुळांना तडे गेल्यामुळे १०० हून अधिक एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आले आहेत. २९ गाड्या या मार्गावरून वळवण्यात आले आहेत. पावसामुळे राज्यात नद्या, जलप्रकल्पांच्या पाणीपातळीमध्ये वाढ झाली आहे. याचवेळी चित्तूर, कडप्पा, अनंतपूर आणि नेल्लोरमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे.

हे देखील पहा-

आंध्र प्रदेशमध्ये पेन्ना नदीला पूर आल्यामुळे शेकडो वाहने आणि प्रवासी अडकले आहेत, महत्त्वाच्या महामार्गावर असलेली वाहतूक बंद करण्यात आली आहे. रेल्वेशिवाय बससेवेवर देखील मोठा परिणाम झाला आहे. नेल्लोर आरटीसी बसस्थानकावर अनेक प्रवासी अडकून पडल्याची माहिती मिळाली आहे. सरकारी आकडेवारीनुसार, पाऊस आणि पुरामुळे कडप्पामध्ये २०, अनंतपूरमध्ये ७, चित्तूरमध्ये ४ आणि एसपीएस नेल्लोरमध्ये २ लोकांचा मृत्यू झाला आहे. नेल्लोर या ठिकाणी सोमशिला जलाशयाजवळ एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे.

आंध्र प्रदेशात पावसाचा हाहा:कार; आतापर्यंत 33 जणांचा मृत्यू, अनेक रस्ते पाण्याखाली
एकविरा आईच्या मंदिर परिसराची दुरवस्था; मनसेनं ठोकलं तिकीट घराला टाळं...

याचवेळी कडप्पा जिल्ह्यात १२ जण बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. शेकडो एकरांवर पसरलेली पिके उद्ध्वस्त झाली आहेत. गुरे वाहून गेली, आणि गावातील अनेक घरे पडली आहेत. आंध्र प्रदेशात तिरुपती शहराला पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे. राज्यात सर्वात मोठ्या जलाशयांना तडे गेल्याच्या बातम्यांनीही या ठिकाणची चिंता वाढवली आहे. मात्र, शहरामध्ये जोरदार पावसाची नोंद झाली नाही. एनडीआरएफच्या १० व्या बटालियनने राजमपेट आणि तिरुपती या ठिकाणी प्रत्येकी २ पथके तैनात करण्यात आली आहेत.

एनडीआरएफच्या तिसऱ्या बटालियनच्या २ पथकांना विशाखापट्टणममध्ये तयार राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. आंध्र प्रदेशात चेन्नई- कोलकाता राष्ट्रीय महामार्ग-१६ हा आंध्र प्रदेश मधील नेल्लोर आणि विजयवाडा आणि चेन्नई ग्रँड ट्रंक रेल्वेमार्ग, देशाच्या दक्षिण आणि पूर्वेकडील आणि उत्तरेकडील भागांना जोडणारा एक महत्त्वाचा रेल्वे मार्ग वाहतुकीकरिता बंद करण्यात आला आहे. पुरामुळे रेल्वे ट्रॅक, रस्ते आणि हवाई वाहतुकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कडप्पा विमानतळ २५ नोव्हेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com