HDFC ग्राहकांना धक्का! आता अधिक EMI भरावा लागणार

देशातील सर्वात मोठी असणारी फायनान्स कंपनी असणारी एचडीएफसीने गृहकर्जाच्या व्याजदरात वाढ केली आहे.
HDFC Bank
HDFC Bank Saam Tv
Published On

नवी दिल्ली: देशातील सर्वात मोठी असणारी फायनान्स कंपनी असणाऱ्या एचडीएफसीने (HDFC) गृहकर्जाच्या व्याजदरात वाढ करून ग्राहकांना धक्का दिला आहे. एचडीएफसीने शनिवारी रिटेल प्राइम लेंडिंग रेट वाढवला. RPLR हा बेंचमार्क कर्ज दर आहे. HDFC ने यात आता ०.२५ टक्क्यांनी वाढ केली आहे.

वाढलेले व्याजदर दर १ ऑगस्टपासून लागू होतील. याचा परिणाम नवीन आणि विद्यमान ग्राहकांवर होणार आहे. दोघांसाठी कर्जाचा ईएमआय (EMI) वाढणार आहे. आणि त्याचा परिणाम आपल्या महिन्याच्या बजेटवर दिसणार आहे. एचडीएफसीने शनिवारी शेअर बाजाराला व्याजदरात वाढ झाल्याची माहिती दिली. “एचडीएफसीने घरांच्या कर्जावरील किरकोळ मुख्य कर्जदरात वाढ केली आहे. २५ बेसिस पॉइंट्स म्हणजेच ०.२५ टक्क्यांनी दर वाढवण्यात आला आहे. नवीन दर १ ऑगस्ट २०२२ पासून लागू होतील.

HDFC Bank
झारखंडमधील पैशांच्या घबाड प्रकरणी सोनिया गांधींनी तीन आमदारांवर केली कारवाई

एचडीएफसीने ९ जून रोजी आरपीएलआरमध्ये ५० बेस पॉइंट्स किंवा ०.५० टक्के वाढ केली होती. यापूर्वी १ जून रोजी ०.५ टक्क्यांनी वाढ करण्यात आली होती. २ मे रोजी व्याजदरात ५ बेसिस पॉइंट्सने वाढ करण्यात आली आणि ९ मे रोजी गृहकर्जाच्या दरात ०.३० टक्क्यांनी वाढ करण्यात आली. एचडीएफसी रिटेल प्राइम लेंडिंग रेटमध्ये या नवीन वाढीमुळे कर्जदारांसाठी गृहकर्ज अधिक महाग होतील आणि त्यांना ईएमआयसाठी जास्त रक्कम खर्च करावी लागेल.

HDFC Bank
Sambhaji Nagar: औरंगाबादकरांना एक दिवसाआड पाणी मिळणार; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीच्या काही दिवसांपूर्वी एचडीएफसीने व्याजदरात ही वाढ केली आहे. आरबीआय (RBI) च्या या एमपीसी बैठकीत महागाई रोखण्यासाठी रेपो दरात वाढ करणे अपेक्षित आहे. पुढील आठवड्यात ही बैठक होणार आहे. पुढील बैठकीत रेपो दर ०.३५ वरून ०.५०% पर्यंत वाढवला जाऊ शकतो. विशेष म्हणजे चलनवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी चलनविषयक धोरण समितीने मे आणि जूनमध्ये सलग दोन टप्प्यांत रेपो दरात ०.९०% वाढ केली होती. त्यामुळे रेपो दर ४.९०% वर गेला आहे. यानंतर बँका आणि इतर कर्ज देणाऱ्या संस्था सातत्याने कर्जावरील व्याजदर वाढवत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com