Haryana Assembly: कुस्तीचे दिग्गज राजकीय आखाड्यात! विनेश फोगाट अन् बजरंग पुनियाचा आज काँग्रेस प्रवेश; विधानसभेसाठी मतदार संघ ठरले

Haryana Assembly Election 2024: काही दिवसांपूर्वीच त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली होती, ज्यानंतर या चर्चा समोर आल्या होत्या. अखेर त्यावर शिक्कामोर्तब झाले असून कुस्तीपटू विनेश फोगट आणि बजरंग पुनिया आज काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.
Haryana Assembly: कुस्तीचे दिग्गज राजकीय आखाड्यात! विनेश फोगाट अन् बजरंग पुनियाचा काँग्रेसमध्ये प्रवेश; विधानसभेसाठी मतदार संघ ठरले
Haryana Assembly Election 2024: Saamtv
Published On

हरियाणा, ता. ६ सप्टेंबर २०२४

Vinesh Phogat Bajrang Punia Join Congress Today: विधानसभेआधी हरियाणामध्ये राजकारण चांगलेच तापले आहे. उमेदवारांची पहिली यादी झाल्यानंतर राज्यात भाजपला धक्के बसत आहेत. अनेक मंत्र्यांनी बंडखोरी केली आहे, तर अनेक आमदार तिकीट न मिळाल्याने नाराज होऊन पक्षाचे राजीनामे देत आहेत. दुसरीकडे काँग्रेससाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. हरियाणामधील कुस्तीपटू विनेश फोगट आणि बजरंग पुनिया आज काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.

कुस्तीचे दिग्गज राजकीय आखाड्यात!

नुकतीच पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा गाजवून आलेली भारताची महिला कुस्तीपटू विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांनी राजकारणात एन्ट्री करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून हे दोन्हीही खेळाडू काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. काही दिवसांपूर्वीच त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली होती, ज्यानंतर या चर्चा समोर आल्या होत्या. अखेर त्यावर शिक्कामोर्तब झाले असून कुस्तीपटू विनेश फोगट आणि बजरंग पुनिया आज काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.

विनेश फोगाट, बजरंग पुनियाचा आज काँग्रेस प्रवेश!

एका खाजगी वृत्तवाहिनीशी बोलताना बजरंग पुनिया यांनी सांगितले की, विनेश फोगट आणि ते आज म्हणजेच 6 सप्टेंबर रोजी दुपारी 1.30 वाजता काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, विनेश फोगटला दादरीमधून तिकीट दिले जाऊ शकते. बजरंग पुनिया हे बदलीमधून तिकीट मागत आहेत, पण काँग्रेसने त्यांना या जागेऐवजी जाट बहुल जागेवरून उमेदवारी देण्याचा विचार केला आहे.

Haryana Assembly: कुस्तीचे दिग्गज राजकीय आखाड्यात! विनेश फोगाट अन् बजरंग पुनियाचा काँग्रेसमध्ये प्रवेश; विधानसभेसाठी मतदार संघ ठरले
Maharashtra Politics : दादांचा वादा अन् अनाथांचा नाथ, लाडक्या बहिणींवरून कॅबिनेट बैठकीत मोठा राडा, पाहा VIDEO

कसे बदलणार राजकारण?

विनेश फोगटच्या संभाव्य राजकीय प्रवेशामुळे हरियाणाच्या राजकारणात मोठा बदल होऊ शकतो. खाप पंचायती आणि शेतकरी यांच्याशी असलेले संबंधांमुळे तिला निवडणुकीत मोठा पाठिंबा मिळू शकतो. कारण शेतकरी आंदोलनाला ती सतत साथ देत आहे. अशा परिस्थितीत शेतकरी समाज काँग्रेसच्या बाजूने येऊ शकतो. आगामी विधानसभा निवडणुकीत विनेश फोगट यांची भूमिका हरियाणाच्या राजकारणाला महत्त्वाचे वळण देणारी ठरू शकते. हरियाणा विधानसभेची निवडणूक ५ ऑक्टोबरला होणार आहे. त्याचवेळी 8 ऑक्टोबरला निकाल लागणार आहे.

Haryana Assembly: कुस्तीचे दिग्गज राजकीय आखाड्यात! विनेश फोगाट अन् बजरंग पुनियाचा काँग्रेसमध्ये प्रवेश; विधानसभेसाठी मतदार संघ ठरले
Crime News : संतापजनक! विवाहितेला दारू पाजली, फुटपाथवरच बलात्कार केला; लोकांनी VIDEO बनवले अन् व्हायरल केले

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com