Car Viral Video बाप रे बाप नोटांचा पाऊस; तरुणाने चालत्या कारमधून फेकल्या नोटा अन्...

Viral Video : या व्हिडिओतील तरुणावर आता पोलिसांनी देखील कारवाई केली आहे.
Car Viral Video
Car Viral VideoANI

Throwing Currency Notes : सोशल मीडियावर नेहमीच अनेक चकित करणारे व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही तरुण मंडळी यामध्ये अतरंगीपणा करताना दिसतात. तरुणांच्या स्टंटबाजीचे अनेक व्हिडिओ आजवर व्हायरल झाले आहेत. कारमध्ये रील व्हिडिओ बनवण्यासाठी तरुण मुलं काय करतील याचा काही नेम नाही. सध्या सोशल मीडियावर अशाच अतरंगी तरुणांचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला आहे. (Haryana Gurugram)

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक तरुण चालत्या कारमधून रस्त्यावर नोटा फेकत आहे. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने पसरलाय. या व्हिडिओतील तरुणावर आता पोलिसांनी देखील कारवाई केली आहे.

Car Viral Video
Viral News: सॉफ्टवेअर इंजिनीअर नवऱ्याची वाटणी; ३ दिवस पहिल्या बायकोकडे, ३ दिवस दुसऱ्या बायकोकडे राहणार, रविवारी सुट्टी

मिळालेल्या माहितीनुसार, सदर व्हिडिओ हरियाणाच्या गुरुग्राममधील आहे. यामध्ये तरुण गोल्फ कोर्स रोडवर कार चालवत आहे. तर त्याचा मित्र कारच्या ट्रंकवर बसला आहे आणि नोटांचे बंडल खोलून ते हवेत फेकत आहे.

Car Viral Video
OYO Rooms: सलाम तुझ्या जिद्दीला! अवघ्या 19 व्या वर्षी सुरू केलेल्या कंपनीचं दिवाळं निघालं; न डगमगता पठ्ठ्यानं OYO उभारलं

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणाचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर त्या तरुणाचा लगेच शोध सुरू झाला. व्हिडिओमध्ये कारचा नंबर दिसत असल्याने पोलिसांना या तरुणाला पकडता आलं आहे. कार आणि त्यात असलेल्या दोन तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे.

रील व्हिडिओसाठी फेकल्या नोटा

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, या तरुणाला एक रील व्हिडिओ शूट करायचा होता. त्यासाठी त्याने बनावट नोटा फेकल्या आहेत. बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरची 'फर्जी' ही वेब सीरिज तुमच्या पैकी काहींनी पाहिलीच असेल. यात देखील असाच एक सीन दाखवण्यात आला आहे.

यात शाहिदचा एक मित्र अशाच प्रकारे चालत्या कारमधून नोटा फेकत होता. त्यावेळी पोलिसांच्या तावडीतून तो निसटतो. या तरुणांनी देखील त्यांच्या एका यूट्युब चॅनलसाठी हा व्हिडिओ शूट केला होता. मात्र हे दोन्ही तरुण आता पोलिसांच्या अटकेत आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com