H3N2 VIRUS : जगभरात H3N2 व्हायरसचं थैमान; एकाचा मृत्यू, केंद्र सरकारने बोलावली तातडीने बैठक

या आजारामुळे केंद्र सरकारने महत्वाची बैठक बोलावली आहे.
ICMR On H3N2 Virus
ICMR On H3N2 VirusSaam TV

H3N2 Influenza Cases In India : कोरोना महामारीनंतर आता देशभरात H3N2 या रुग्णांचे प्रमाण वाढत चालले आहे. संपूर्ण देशभरात H3N2 इन्फ्लूएंझाचे हजारो रुग्ण आढळले आहेत. हा आकडा पुढे आणखीन वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या सहा महिन्यांत या विषाणूमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे, असं दिल्लीच्या सर गंगाराम रुग्णालयातील आरोग्य तज्ञांनी म्हटलं आहे. संपूर्ण जगभर H3N2 रुग्णांमध्ये वाढ झाल्याने पुन्हा एकदा कोरोना महामारी सारखी स्थिती निर्माण होणार का? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. या आजारामुळे केंद्र सरकारने महत्वाची बैठक बोलावली आहे. (H3N2 VIRUS)

H3N2 विषाणूमुळे मोठ्या वैद्यकीय समस्या येत आहेत. यात फुप्फुसांच्या संसर्गाची भीती आहे. मिंट या वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या सहा महिन्यांमध्ये H3N2 विषाणूचा पॅटर्न बदलला आहे. याने श्वसनाच्या अधिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. गेल्या २ महिन्यांपासून या व्हायसच्या रुग्णांमध्ये जास्त वाढ झाली आहे. त्यासाठी ठिकठिकाणी अतिदक्षता विभाग सुरू करण्यात आलेत.

ICMR On H3N2 Virus
H3N2 चं देशावर संकट! 3 हजार रुग्णांना H3N2 ची लागण!

H3N2 ची लक्षणे काय आहेत?

ताप

सर्दी

खोकला

छातीत दुखणे

सांधेदुखी

थकवा

घसा वारंवार खवखवणे अशी लक्षणे जाणवतात.

ICMR On H3N2 Virus
H3N2 Virus : कोरोनानंतर 'या' जीवघेण्या व्हायरसनं वाढवलं टेन्शन !

H3N2 पासून कोणत्या व्यक्तीने अधिक काळजी घ्यावी?

H3N2 चे काही प्रकार आहेत. त्यातील इन्फ्लूएंझा हा कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला होऊ शकतो. यामध्ये तरुण सुदृढ व्यक्तीला या विषाणूची लगेच लागण होत नाही. मात्र लहान मुलं (५ वर्षांखालील) तसेच गर्भवती महिला, वृद्ध नागरिक यांना या विषाणूची पटकन लागण होते. त्यामुळे या व्यक्तींनी स्वत:ची विशेष काळजी घेणे गरजेचं आहे.

सध्या अनेक व्यक्तींना ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे दिसत आहेत. यातील बहुतेक व्यक्ती कोमट पाणी पिऊन देखील ठिक होत आहेत. रोगप्रतिकारक शक्ती जास्त असल्यास या आजाराचा जास्त त्रास होणार नाही. मात्र तसे नसेल तर इन्फ्लूएंझाने जीव जाण्याची देखील शक्यता आहे.

सध्या देशात H3N2 व्हायरसच्या ९० केस असल्याची माहिती समोर आली आहे. कर्नाटकमधील एका व्यक्तीचा या आजाराने मृत्यू झाला आहे. कर्नाटकत ८२ वर्षीय एका व्यक्तीचा मृत्यू झालाय. त्यांना २४ फेब्रुवारी रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. १ मार्च रोजी त्यांच निधन झालं.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com