काय सांगता! रातोरात व्यक्ती झाली ११,६७७ कोटींची मालक, अन् पुढे जे झालं ते वाचून व्हाल थक्क

डीमॅट खात्यावर जमा झालेली रक्कम काही वेळातच पाठिमागे गेली. पण तोपर्यंत त्याने पैशावर पाच लाख रुपये कमावले.
Gujarat News
Gujarat NewsSaam Tv

नवी दिल्ली: सध्या डिजीटलचे युग सुरू आहे. देशातील बँकाही (Bank) डिजीटल झाल्या आहेत. पण या डिजीटल युगात बँकांच्या चुकाही होत असल्याचे दिसत आहे. अचानक एखाद्या खात्यावर करोडो रुपये जमा होता. तर काहींचे पैसेच गायब झाल्याचे समोर आले. काही दिवसापूर्वी गुजरातमधील एका व्यक्तीच्या खात्यावर रात्री अचानक ११ हजार ६७७ कोटी जमा झाले. पण हे पैसे त्या खात्यावर जास्त वेळ राहिले नाहीत. काही वेळातच ते पैसे परत गेले. पण त्या व्यक्तीने २ तासातच या पैशाचा वापर करुन ५ लाख रुपये कमावल्याचे समोर आले आहे.

Gujarat News
PM Modi Birthday: मोदींच्या वाढदिवसानिमित्त आज 'या' राज्यात जन्मणाऱ्या मुलांना मिळणार सोन्याची अंगठी

२६ जुलै दिवशी रोजी गुजरातच्या (Gujarat) रमेशभाई सागर यांचा मोबाईल वाजला. यावेळी त्यांनी उशीरा मोबाईल पाहिला तर त्यांच्या खात्यावर ११ हजार ६७७ कोटी रुपये जमा झाले होते. रमेशभाई यांनी वेळ न वाया घालवत यातील २ कोटी रुपये स्टॉकमध्ये गुंतवले होते, यातून त्यांना अर्ध्या तासात ५ लाख रुपये मिळाले.

रमेशभाई सागर हे गेल्या ५-६ वर्षांपासून शेअर बाजारात पैसे गुंतवण्याचे काम करत आहेत. 'मी लगेच निर्णय घेतो, त्यामुळे मला फायदा झाला.' असं रमेशभाई म्हणाले.

Gujarat News
Diabetes : तज्ज्ञांनी सांगितले, मधुमेह असणाऱ्यांना मिळेल आता आराम; करा 'या' रोपाचे सेवन !

'मी २६ जुलै रोजी नेहमीप्रमाणे सकाळी ९.३० वाजता ट्रेडिंगसाठी बसलो होतो. २-३ व्यवहार केले, पण त्या दिवशी बाजारात फारशी हालचाल नव्हती. नंतर ११.३० वाजेपर्यंत थांबलो. यावेळी अचानक मी मेसेज तपासला तर तेव्हा माझ्या खात्यात ११,६७७ कोटी रुपये आले होते.

२ कोटी रुपयांची गुंतवणूक केल्यानंतर, त्यांना ५.६४ लाख रुपयांचा नफा झाला आणि काही वेळानंतर जमा झालेले ११ हजार २७७ कोटी रुपये परत गेले. हे पैसे कुठून आले आणि कुठे गेले माहित नाही, असंही रमेशभाई म्हणाले. त्या दिवशी त्यांच्यासारख्या बिहारमधील व्यक्तीच्या खात्यातही पैसे जमा झाले होते. तीच रक्कम तिथेही ट्रान्सफर झाली, पण ते गुंतवू शकले नाहीत. संधी मिळाली तर चौकार मारावा, असंही रमेशभाई म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com