'World Earth Day'च्या निमित्ताने Googleचे खास Doodle; फोटोंद्वारे दिला 'खास' संदेश

आज पूर्ण जगभरात वसुंधरा दिवस (World Earth Day 2022) साजरा केला जात आहे. हा दिवस आपल्या पृथ्वीला समर्पित आहे. या खास दिवसाच्या निमित्ताने गुगलने खास डुडल बनवले आहे.
Google Doodle
Google Doodleवृत्तसंस्था

मुंबई: आज संपूर्ण जगभरात वसुंधरा दिवस (World Earth Day 2022) साजरा केला जात आहे. हा दिवस आपल्या पृथ्वीला समर्पित आहे. या खास दिवसाच्या निमित्ताने गुगलने (Google) खास डुडल बनवले आहे. आजच्या डुडलमध्ये काही खास फोटोज आहेत जे आपल्या पृथ्वीचा काळानुसार बदल कसा होत गेला हे दर्शवत आहेत. तसेच हे फोटोज चिंता व्यक्त करणारे आहेत.

गुगलने खास डूडलद्वारे (Google Doodle) आजच्या काळातील सत्य सांगण्याचा प्रयत्न केला आहे. या डूडलच्या माध्यमातून Google सर्वांचे लक्ष 'क्लायमेट चेंज'कडे (Climate Change) वेधण्याचा प्रयत्न करत आहे. पृथ्वीवरील (Earth) घटत्या जलवैज्ञानिक बदलाविषयी अनेकदा चर्चा होते. पण, त्यावर गांभीर्याने काम केल्याची उदाहरणे फार कमी आहेत.

Google Doodle
ATM अन् Phone ची Hacking कशी होते? जाणून घ्या हॅकर्स कसे चोरतात तुमचे Passwords?

खरेतर, जलवायूतील बदल तापमान आणि हवामानातील दीर्घकालीन बदल दर्शवितो. 1800 च्या दशकापासून मानवी क्रियाकलाप हवामान बदलावर मोठ्या प्रमाणात प्रभाव टाकत आहेत. विशेषतः कोळसा, तेल आणि वायू यांसारख्या जीवाश्म इंधनामुळे नवीन समस्या निर्माण झाल्या आहेत. Google ने आज आपल्या खास डूडलद्वारे हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे की, हवामान बदलाचा आपल्या पृथ्वीवर कसा परिणाम झाला आहे.

ही गोष्ट समजावून सांगण्यासाठी गुगलने डूडलच्या माध्यमातून चार वेगवेगळ्या ठिकाणांच्या अॅनिमेशनची मालिका (Animation Series) तयार केली आहे. Google Earth Time lapse आणि इतर स्त्रोतांकडील Real Time Lapse चे इमेजरी वापरून, हे डूडल आपल्या ग्रहाभोवती चार वेगवेगळ्या ठिकाणी हवामान बदलाचे परिणाम दर्शवित आहे.

हे देखील पहा-

या खास अॅनिमेशनमध्ये चार चित्रांचा वापर करण्यात आलेला आहे. यामध्ये टांझानियामधील माऊंट किलीमांजारो, सेमेरसुकिन ग्रीनलँड, ऑस्ट्रेलियातील ग्रेट बॅरियर रीफ आणि जर्मनीतील अॅलेंडमधील हार्ज फॉरेस्ट यांचा समावेश आहे. दरवर्षी 22 एप्रिल रोजी 'अर्थ डे' साजरा केला जातो.

आपल्या भावी पिढ्यांसाठी पृथ्वी वाचवण्याची एक प्रतिज्ञा म्हणून हा दिवस साजरा केला जातो. वसुंधरा दिन पहिल्यांदा 22 एप्रिल 1970 रोजी साजरा करण्यात आला होता. तसेच दरवर्षी वसुंधरा दिनासाठी एक खास थीम ठेवली जाते. या वर्षीची थीम 'इन्व्हेस्ट इन अवर प्लॅनेट' (Invest in our planet) आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com