Google Layoff 2023 : गुगलचा मोठा झटका! 12 हजार कर्मचाऱ्यांना दिला नारळ

गुगलची पॅरेंट कंपनी अल्फाबेटने कर्मचारी कपातीची घोषणा केली आहे.
Sundar Pichai - Google Layoff 2023
Sundar Pichai - Google Layoff 2023Saam Tv

Google Layoff 2023 : एकीकडे संपूर्ण जगात मंदीचे सावट असताना आता गुगलची पॅरेंट कंपनी अल्फाबेटने कर्मचारी कपातीची घोषणा केली आहे. याचा सर्वाधिक परिणाम अमेरिकन कर्मचाऱ्यांवर होणार असल्याचे बोलले जात आहे. जगभरातील सहा टक्के नोकर कपात करण्याचा निर्णय गुगलनं घेतला आहे.

Sundar Pichai - Google Layoff 2023
Mumbai Crime News : अल्पवयीन मुलींना अश्लील व्हिडिओ पाठवायचा, पोलिसांनी इंगाच दाखवला

मायक्रोसॉफ्ट कंपनीनं आपल्या 10,000 कर्मचाऱ्यांना काढून टाकलं होतं. ही बातमी ताजी असतानाच अल्फाबेट कंपनीनं 12 हजार कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याच्या तयारीत आहे. याबाबत कंपनीचे सीईओ सुंदर पिचाई (Sundar Pichai) यांनी कर्मचाऱ्यांना एक मेल पाठवला आहे.

"आम्ही घेतलेल्या निर्णयांची संपूर्ण जबाबदारी घेत. एकूण खर्चाचं नियोजन आणि पुढील तयारासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. नोकरीवरुन काढलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांचा नोटीस कालावधी असेल अथवा 60 दिवसांचा पगार दिला जाईल, अशी माहिती गुगलचे (Google) सीईओ सुंदर पिचाई यांनी कर्मचाऱ्यांना ईमेलवरुन दिली आहे.

Sundar Pichai - Google Layoff 2023
Education News: MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! इतिहासातील सर्वात मोठी मेगाभरती, 8 हजार 169 पदे भरली जाणार

जागतिक अर्थव्यवस्था आणि वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर मोठ्या टेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याचा निर्णय घेतला आहे. नुकतेच मायक्रोसॉफ्टने 10,000 कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची घोषणा केली आहे. याशिवाय Amazon ने जवळपास 18000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये सुमारे एक हजार भारतीय कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. या बातमीमुळे टेक्नॉलजी क्षेत्रात खळबळ उडाली होती. या बातम्या ताज्या असतानाच अल्फाबेट कंपनीनं 12 हजार कर्मचाऱ्यांना नारळ दिला आहे. 

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com