Goa Assembly Election: भाजपच्या 'श्रीवल्ली' गाण्याची चर्चा; पहा Video

अल्लू अर्जुनच्या पुष्पा (Pushpa-The Rise) या सिनेमाने आणि त्यातील गाण्यांनी सर्वानाच भुरळ घातली आहे.
Goa Assembly Election
Goa Assembly ElectionSaam TV
Published On

रश्मी पुराणिक

पणजी: अल्लू अर्जुनच्या पुष्पा (Pushpa-The Rise) या सिनेमाने आणि त्यातील गाण्यांनी सर्वानाच भुरळ घातली आहे. श्रीवल्ली गाने तर सर्वांच्या पसंतीला उतरले आहे. सोशल मीडियावर (Social Media) तर या गाण्याने धुमाकूळ घातला आहे. त्यात आता तर या गाण्याची भुरळ राजकीय पक्षांनाही घातली आहे. याचाच प्रत्यय सध्या गोव्यामध्ये (Goa) पहायला मिळत आहे. गोवा निवडणुकीचा प्रचार सध्या अंतिम टप्प्यात असून, सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. त्यातच सत्तेत असलेल्या भाजपसाठी ही निवडणूक महत्वाची आहे. याचमुळे भाजपने प्रचारासाठी पुष्पा सिनेमातील श्रीवल्ली गाण्याचा आधार घेत एक गाणे बनवले आहे. त्यामुळे पुष्पा सिनेमातील श्री वल्लीचा गोवा भाजपला (Goa BJP) किती फायदा होणार हे पहावे लागेल.

दरम्यान कोरोनाने चित्रपटगृह बंद होते. त्यानंतर कधी सुरु तर कधी बंद. आता साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जूनचा चित्रपट पुष्पा आला आणि तरुणांपासून ते म्हाताऱ्यांपर्यंत सर्वांना या चित्रपटाने आणि त्यातल्या गाण्याने सर्वांना भुरळ घातली आहे. देशातील अनेक राजकाराणी त्या गाण्यावर थिरकताना दिसले. गोव्यातील विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. १४ तारखेला गोव्यामध्ये मतदान आहे. त्यामुळे नेत्यांनी प्रचार सुरु केला आहे. गोव्यात सध्या भाजपची सत्ता आहे. निवडणुकीच्या तोंडावर भाजपाने टाकलेलं हे गाणं मतपरिवर्तन करणार का? हे येणारा काळचं सांगेल.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com