Madhya Pradesh News: हिजाब घातलेल्या मुलीसोबत डिनरसाठी निघाला होता तरूण; जमावाचा हल्ला, खुद्द मुख्यमंत्र्यांनी घेतली गंभीर दखल

Madhya Pradesh News : मध्य प्रदेशमधून एक धक्कादायक वृत्त हाती आलं आहे.
Madhya Pradesh News
Madhya Pradesh News Saam tv

Madhya Pradesh Viral Video: मध्य प्रदेशमधून एक धक्कादायक वृत्त हाती आलं आहे. मध्य प्रदेशमधील तरुण हा त्याच्या हिजाब घातलेल्या मैत्रिणीसोबत रात्रीचं जेवण करायला निघाला होता. त्यावेळी जमावाने त्याला अडवून हल्ला केल्याची घटना घडली. सदर घटना कॅमेरात कैद झाली आहे.

मध्य प्रदेशामधील हा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवरून नेटकऱ्यांनी उलटसुलट प्रतिक्रिया दिल्या आहेत. या प्रकरणाची खुद्ध मुख्यमंत्र्यांनी देखील गंभीर दखल घेतली आहे. (Latest Marathi News)

एका वृत्तानुसार, मध्य प्रदेशातील एका पोलीस अधिकाऱ्यांनी शुक्रवारी घडलेल्या घटनेबद्दल माहिती दिली. पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, मध्य प्रदेशच्या एका हॉटेलच्या बाहेर दोन भिन्न धर्माच्या तरुण आणि तरुणीला मारहाण झाल्याची घटना घडली.

या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. गुरुवारी रात्री ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात जमावामधील काही जणांना अटक करण्यात आली आहे.

Madhya Pradesh News
Parliament building Row: नव्या संसद भवनाचा वाद पेटला! अरविंद केजरीवाल, खर्गेंविरोधात तक्रार दाखल

इंदूरचे वरिष्ठ पोलीस अधिकारी राजेश रघुवंशी यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. राजेश रघुवंशी यांनी सांगितले की, हॉटेलमध्ये हिजाब घातलेली तरुणी आणि एक तरुण एकत्र रात्री भोजण करत होते. त्यानंतर जेवण करून बाहेर पडल्यानंतर जमावाने त्यांना रोखलं.

या जमावाने हिजाब घातलेल्या मुलीसोबत का फिरतोस, असं म्हणत तरुणावर आक्षेप घेतला. त्यानंतर या जमावाने या तरुणाला बेदम मारहाण केली'.

'या तरुणीने जमावाला मी आई-वडिलांना विचारून मित्रासोबत जेवण करण्यास आली , असे सांगितले. मात्र, जमावाने तिचं म्हणणं ऐकून घेतलं नाही. यावेळी भडकलेल्या जमावाने तरुणावर धारदार शस्त्राने तरुणावर हल्ला देखील केला, असेही राजेश रघुवंशी यांनी सांगितले. दरम्यान, हे सर्व प्रकरण इंदूरच्या तुकोगंज पोलीस स्टेशनच्या हद्दीतील आहे.

Madhya Pradesh News
Eknath Shinde News: नवीन संसदेच्या उद्घाटनावर बहिष्कार टाकणाऱ्यांवर CM शिंदेंचा हल्लाबोल; म्हणाले...

या प्रकरणात पोलिसांनी भादंवि ३०७ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. आतापर्यंत पोलिसांनी जमावातील सात जणांचा शोध घेतला आहे. अटक करण्यात आलेले युवक २३-२६ वयागटातील आहेत. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी या प्रकरणाची दखल घेतली असून कारवाईचे आदेश दिले आहेत .

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com