Ghulam Nabi Azad News: 'पूर्वी सर्व हिंदू होते, धर्मांतरानंतर मुस्लिम झाले... गुलाम नबी आझाद यांचं वक्तव्य

Ghulam Nabi Azad Statement: काँग्रेसचे माजी नेते आणि डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पक्षाचे प्रमुख गुलाम नबी आझाद यांच्या एका वक्तव्याने नवा वाद उभा राहण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
Ghulam Nabi Azad News
Ghulam Nabi Azad NewsSaam TV
Published On

News: काँग्रेसचे माजी नेते आणि डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पक्षाचे प्रमुख गुलाम नबी आझाद यांच्या एका वक्तव्याने नवा वाद उभा राहण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. “मुस्लिम आधी हिंदूच होते, धर्मांतरानंतर ते मुस्लिम झाले”, असं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी डोडा जिल्ह्यात एका मेळाव्यात केले.

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, डोडा जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी मेळावा झाला. या मेळावातील गुलाब नबी आझाद यांचे भाषण सध्या वादाचा विषय ठरत आहे. काश्मीरमधील सर्व लोक हिंदू धर्मातून धर्मांतर करुन मुस्लीम झाले आहे. बाहेरुन फार मोजके लोक इथे आले आहेत. बाकी सर्वजण मूळचे हिंदूच आहेत.. असे विधान त्यांनी यावेळी केले.

आपल्या भाषणात पुढे बोलताना "काश्मीरमध्ये आजपासून 600 वर्षांपूर्वी मुस्लीम लोक नव्हती. सर्वजण धर्मांतर करुन मुस्लीम झाले आहेत. इथे केवळ काश्मीरी पंडित होते. सर्वजण धर्मांतर करुन मुस्लीम झाले. आम्ही बाहेरुन आलेलो नाही. आमचा जन्म इथलाच आहे आणि इथेच आम्ही संपणार, असेही ते म्हणाले.

दरम्यान, आपले हिंदू बांधव पार्थिव अग्नीच्या स्वाधीन करतात. तर आपल्याकडे मुस्लीम बांधव मरण पावल्यानंतर त्याचं पार्थिव जमीनीत पुरतात. आपल्या सर्वांचा देह तर याच भारत मातेच्या मातीत मिसळतो. त्यामुळे हिंदू मुस्लीम भेदभाव योग्य नाही, असेही ते पुढे बोलताना म्हणाले. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com