जर्मनीला पुराचा तडाखा : नदीकाठच्या भागाला मोठे भगदाड

पुरामुळे शहरात भूस्खलन (Landslide) झाले असून अनेक लोक मृत्यूमुखी पडले आहेत.
जर्मनीला पुराचा तडाखा : नदीकाठच्या भागाला मोठे भगदाड
जर्मनीला पुराचा तडाखा : नदीकाठच्या भागाला मोठे भगदाडTwitter/@World Meteorological Organization

जर्मनी : जर्मनीला (Germeny) सध्या मोठ्या प्रमाणात पूराचा (Flood) सामना करावा लागत आहे. उत्तर जर्मनीतील ब्लेसेम शहरात (Blessem City) पूराचा हाहाकार माजला आहे. पुरामुळे शहरात भूस्खलन (Landslide0 झाले असून अनेक लोक मृत्यूमुखी पडले आहेत. पुराचा कहर इतका भयंकर आहे की एरफ्ट नदीचा किनाराही वाहून गेला आहे. ज्यामुळे या ठिकाणी प्रचंड मोठा आणि खोल सिंखोल (खळगा) (Sinkhole) तयार झाला आहे. (Floods hit Germany: Large cracks along riverbanks)

जर्मनीला पुराचा तडाखा : नदीकाठच्या भागाला मोठे भगदाड
तब्बल 20 लाख व्हॉट्सअ‍ॅप युजर्सचे अकाउंट बॅन! जाणून घ्या कारण

या पुरामध्ये कोलोनयेथील ब्लेसेममध्ये बांधलेल्या राजवाड्याचा काही भाग आणि शहरातील अनेक घरे वाहून गेली आहेत. या नैसर्गिक आपत्तीमुळे नदीकाठही प्रभावित झाले आहेत. याठिकाणी एक प्रचंड सिंखोल तयार झाला आहे. नदीकाठच्या उंच भागातून या विशाल खड्ड्यात पूराचे पाणी वाहत आहे. दरम्यान स्थानिक सरकारच्या प्रवक्त्यांनी अद्याप या पुरातील जीवीतहानीची कोणतीही माहिती दिलेली नसल्याचे स्थानिक माध्यमांचे म्हणणे आहे. मात्र या पुरात शहरातील अनेक घरे वाहून गेली असून अनेक घरांची पडझड झाल्याची माहिती कोलोनच्या स्थानिक प्राधिकरणाने ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.

जर्मनीला पुराचा तडाखा : नदीकाठच्या भागाला मोठे भगदाड
पवार - मोदी भेटीवर अंजली दमानिया म्हणाल्या: महाराष्ट्राचं वाटोळं आता...

काउंटी अॅडमिनिस्ट्रेशनचे प्रमुख फ्रँक रॉक यांनी याबाबत माहिती दिली आहे. गुरुवारी रात्री 50 लोकांना पुरातून बाहेर काढण्यात आले. तर अद्यापही 15 लोक अडकल्याची माहिती असून त्यांचे बचावकार्य सुरू आहे. मात्र आतापर्यंत पुरात किती लोकांचा मृत्यू झाला याची कोणतीही अधिकृत आकडेवारी त्यांना मिळाली नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. मात्र या संकटात काही लोकांना स्वतचे प्राण वाचविता आले नसल्याचे त्यांनी मान्य केले आहे.

भूगोलशास्त्राच्या मॅथियस हाबेल यांच्या म्हणण्यानुसार, नदीला पूर पुराच्या पाण्याचा दबाव सहन करता न करता आल्यामुळे नदी किनाऱ्याच्या एका बाजूच्या जमिनीला मोठी खळगा तयार झाला आहे. हा खळगा ३०० मीटरपर्यंत पसरला असून पाण्याच्या प्रवाहामुळे हा खड्डा दिवसेंदिवस मोठा होत असल्याचे बोलले जात आहे. याठिकाणचा धोका अद्याप कायम असल्याने तेथील स्थानिकांना घरी न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.

गेल्या काही दशकांत जर्मनीत आलेल्या अनेक पूरांपैकी यंदाचा पूर सर्वात धोकादाक आहे. यामुळे आतापर्यंत 100 हून अधिक लोकांचे प्राण गमावले आहेत. मुसळधार पावसामुळे नद्यांचे पात्र ओसंडून वाहू लागले आहेत. संपूर्ण शहरे व गावे पुरामुळे प्रभावित झाली आहेत. मोबाइल फोन नेटवर्क आणि इंटरनेट कनेक्शन ठप्प झाले आहेत. हरवलेल्या लोकांना शोधण्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तर मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Edited By- Anuradha

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com