बंगळुरूमध्ये चौघांची आत्महत्या; कुटुंबातील बालकाचाही गेला भूकबळी

कर्नाटकात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे बंगळुरूमध्ये एकाच घरात पाच जणांचे मृतदेह सापडले आहेत.
बंगळुरूमध्ये चौघांची आत्महत्या; कुटुंबातील बालकाचाही गेला भूकबळी
बंगळुरूमध्ये चौघांची आत्महत्या; कुटुंबातील बालकाचाही गेला भूकबळीSaam Tv
Published On

बंगळुरू: दिल्लीच्या बुरारी येथील सामूहिक आत्महत्येसारख्या प्रकरणानंतर बंगळुरूच्या बयादरहल्ली भागातील एका घरातून पाच कुजलेले मृतदेह सापडले आहेत. त्यापैकी चार जण गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले आहेत. तर नऊ महिन्यांचा चिमुकला बेडवर मृतावस्थेत आढळला. अहवालांमध्ये असे म्हटले जात आहे की, त्याच्या कुटुंबाचे कथितपणे आयुष्य संपवल्यानंतर बाळाचा उपासमारीने मृत्यू झाला असावा.

हे देखील पहा-

शुक्रवारी रात्री बयादरहल्ली पोलीस स्टेशन परिसरातील घराच्या आत पाच मृतदेह आढळले. भरती (51), सिंचना (34), सिंधुराणी (31) आणि मधुसागर (25) अशी मृतांची नावे आहेत. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, शुक्रवारी जेव्हा ते घरात गेले तेव्हा सदस्य वेगवेगळ्या खोल्यांमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले. मृत्यचे कारण अद्याप अस्पष्ट आहे परंतु, कौटुंबिक वादामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचा संशय आहे. सुमारे चार दिवसांपूर्वी या कुटुंबाचा मृत्यू झाला असावा असा संशय आहे.

बंगळुरूमध्ये चौघांची आत्महत्या; कुटुंबातील बालकाचाही गेला भूकबळी
Cyber Crime: अ‍ॅपमध्ये पैशांची गुंतवणूक पडली महागात; 5 लाखांचा गंडा

घरमालकांनी केला घटनेचा उलघडा;

"बेंगळुरू पश्चिमचे डीसीपी संजीव पाटील यांनी माहिती दिली, “घराचे मालक हलेगिरी शंकर तीन-चार दिवसांनी घरी आले तेव्हा ही घटना उघडकीस आली. त्यांनी सांगितले की, गेल्या दोन-तीन दिवसांपासून कोणालाही त्यांचा कॉल येत नव्हता. घरमालक घरी आले तेव्हा त्यांना दरवाजा बंद असल्याचे आढळले, "बेंगळुरू पश्चिमचे डीसीपी संजीव पाटील म्हणाले.

पोलिसांनी पुढे माहिती दिली, घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले. त्यांनी घराचा दरवाजा तोडला. पोलीस घरात गेल्यावर, चार प्रौढ व्यक्तींचे मृतदेह वेगवेगळ्या खोल्यांमध्ये घरच्या छताला लटकलेले आढळले आणि बाळाचा मृतदेह अंथरुणावर मृतावस्थेत आढळला,” अशी माहिती त्यांनी दिली.

अडीच वर्षांच्या मुलीची घरातून सुटका;

एका अडीच वर्षांच्या मुलीची घरातून सुटका करण्यात आली असून, तिला प्राथमिक उपचार देण्यासाठी जवळच्या रुग्णालयात नेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. घटनेचे कारण तपासले जात आहे. फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीचे (FSL) एक पथक बोलावले असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. असे पोलीस पाटील यांनी सांगितले.

भारती ही शंकराची पत्नी आहे आणि इतर तीन प्रौढ त्यांची मुले आहेत. नऊ महिन्याचे बाळ आणि अडीच वर्षांची मुलगी भारती आणि शंकर यांची नातवंडे असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

जुलै 2018 मध्ये दिल्लीत झालेल्या घटनेची पुनरावृत्ती;

अशाच एका घटनेने जुलै 2018 मध्ये राष्ट्रीय राजधानी दिल्लीला धक्का बसला होता. त्यावेळेस एका कुटुंबातील 11 सदस्य बुरारी भागात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले होते. 10 सदस्य घराच्या छतावर लोखंडी जाळीने लटकलेले आढळले होते, तर 77 वर्षीय महिला दुसऱ्या खोलीत जमिनीवर पडलेली आढळली होती. पोलिसांच्या प्राथमिक तपासामध्ये सुरुवातीला असे म्हटले होते की, त्यांचा मृत्यू आत्महत्येने झाला आहे पण दुसरी माहिती अशीही मिळत होती की, त्यांच्या मृत्यूला जादूटोणा हेही एक कारण असू शकत.

Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com