PM Narendra Modi: भाजपला चारही दिशांहून आशीर्वाद मिळालाय - मोदी

भाजपने नवी दिल्ली येथील भाजप मुख्यालयात आनंदोत्सव साजरा केला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं.
PM Narendra Modi
PM Narendra ModiSaam Tv

नवी दिल्ली: पाच पैकी चार राज्यांमध्ये भाजपने घवघवीत यश प्राप्त केलं आहे. गोवा, उत्तर प्रदेश, गोवा आणि मणिपूर या राज्यांमधील विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपने मुसंडी मारत दणदणीत विजय मिळवला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने नवी दिल्ली येथील भाजप मुख्यालयात आनंदोत्सव साजरा केला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं. यावेळी भाजप कार्यकर्त्यांची मोठी गर्दी येथे जमली होती. (Five State Assembly Election Results BJP Won In 4 States PM Modi Speech).

PM Narendra Modi
Goa Election Result 2022: काँग्रेसचा कोणी घेणार नाही, गोव्यात फडणवीस ठाम

आज उत्साह आणि उत्सवाचा दिवस आहे. हा उत्सव भारताच्या लोकशाहीसाठी आहे. या निवडणुकांमध्ये सहभाग घेणाऱ्या सर्व मतदारांना शुभेच्छा. त्यांच्या निर्णयासाठी मतदारांचा आबार व्यक्त करतो. विशेषकरुन महिला, तरुणांनी भाजपला भरघोस समर्थन दर्शवलं आहे ते खूप मोठा संदेश आहे. पहिल्यांना मतदान करणाऱ्या मतदारांनी मोठ्या प्रणामात मतदान केलं आणि भाजपला (BJP) निवडून आणलं.

निवडणुकांदरम्यान भाजपच्या कार्यकर्त्यांनी मला आश्वासन दिलं होती की यंदा होळी १० मार्चपासून सुरु होईल. आमच्या कार्यकर्त्यांनी हे आश्वासन पाळलं आहे. मी त्यांचं कौतुक करतो. ज्यांनी दिवस-रात्र या निवडणुकीत काम केलं, जनतेचं मन आणि विश्वास जिकण्यात ते यशस्वी ठरले. तसेच, ज्यांनी त्यांना मार्गदर्शन केलं त्या जे पी नड्डा यांचंही आधार मानतो.

कार्यकर्त्यांनी आझ एनडीएसाठी विजयाचा चौकार लावला आहे. उत्तर प्रदेशने देशाला अनेक पंतप्रधान दिलेत, पण, पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलेल्या एखाद्या मुख्यमंत्र्याला पुन्हा निवडणुन आणण्याचा ही पहिलीच वेळ आहे. ३७ वर्षांनंतर पहिल्यांदा एखादी सरकार सलग दुसऱ्या वेळी सत्तेत आली आहे. उत्तर प्रदेश, गोवा आणि मणिपूरमध्ये (Uttar Pradesh, Goa and Manipur) सरकारमध्ये असूनही भाजपच्या व्होट शेअरिंगमध्ये वाढ झाली आहे.

गोव्यात सर्व एक्झिट पोल चुकले -

गोव्यात सर्व एक्झिट पोल चुकले, तिथल्या जनतेने तिसऱ्यांदा सेवेची संधी दिली आहे. १० वर्षांपर्यंत सत्तेत राहिल्यानंतरही भाजपच्या जागांची संख्या वाढली आहे. उत्तराखंडमध्येही भाजपने नवा इतिहास रचला आहे. राज्यात पहिल्यांदा एक पक्ष सलग दुसऱ्यांदा सत्तेत आलीये. भाजपला चारही दिशांहून आशीर्वाद मिळाला आहे. या राज्यांमधील आव्हानं वेगळी आहेत, विकासाचा मार्ग वेगळा आहे, पण त्यांना एका माळेत आणण्याचं काम भाजपवरील विश्वास करत आहे. हे निवडणूक निकाल भाजपच्या प्रो पुअर, प्रो अॅक्टिव्ह गव्हर्न्सवर एकप्रकारे मुहर लावणारे आहेत.

आधी जनता आपल्याच हक्कांसाठी सरकारकडे जाऊन मदत मागत होती, पण त्यांना मिळत नव्हती. विज, पाणी, गॅस अत्यंत सामान्य सुविधांसाठी, गरजांची सरकारी कार्यालयांमध्ये वारंवार जावं लागत होतं. पैसे द्यावे लागत होते. देशात गरिबांच्या नावांवर घोषणा आणि योजना खूप झाल्या. पण, ज्या गरिबाचा त्यावर अधिकार होता, तो त्याला मिळत नाही. त्यासाठी आम्ही काम केले.

हे देखील पहा -

शेवटच्या व्यक्तीपर्यंत योजना कशा न्यायच्या हे मला माहितेय. गेल्या काही वर्षात आम्ही गव्हर्न्स डिलव्हरी सिस्टीम मजबूत केली, पारदर्शकता आणली. गरिबाच्या घरापर्यंत त्याला हक्क पोहोचवल्याशिवाय मी थांबणार नाही.

निकालांध्ये महिलांचा मोठा हात -

सरकारमध्ये किती अडचणी येतात हे मला माहितीये. मी सांगितलं होतं की भाजपला जिथे जिथे सेवा करण्याची संधी मिळेल तिथे आम्ही प्रत्येक योजनेच्या लाभार्थ्यांसाठी १०० टक्के सॅच्युरेशन केलं. हे खूप हिमतीचं काम आहे. जेव्हा प्रामाणिकपणा असते, नियत स्वच्छ असते, गरिबांप्रती करुणा असते, देशाची प्रगती हाच जीवनाचा मंत्र असतो, तेव्हा असे निर्णय घेण्याची हिम्मत येते. आम्ही प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचू.

निवडणुकांच्या निकालात महिलांचा मोठा हात, भाजपला माता, भगिणींचं इतकं समर्थन केलंय. जिथे महिलांनी अधिक मतदान केलंय तिथे भाजपला मोठा विजय मिळालाय, ते आमच्या विजयाचे सारथी झाले आहेत.

या निवडणुकांच्या निकालाने एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की, उत्तर प्रदेशच्या जनतेला जातीवादमध्ये अडकवून ज्या जातींचा काही लोक अपमान करत होते, ज्या नागरिकांचा अपमान करत होते, पूर्ण उत्तर प्रदेशचा अपमान करत होते. इथल्या निवडणुकांमध्ये जाती चालते असं म्हणून काही लोक यूपीला बदनाम करतात. यूपीच्या लोकांनी दाखवून दिलं की त्यांना विकास हवाय, त्यांनी नेहमी विकास निवडला आहे. यूपीच्या गरिबातील गरिब व्यक्तीने त्या लोकांना हा पाठ शिकवला आहे की जातीचा मान हा देशाला जोडण्यासाठी व्हायला हवा, तोडण्यासाठी नाही.

२०१९ च्या निवडणुकांच्या निकालानंतर जेव्हा लोकसभेत आम्ही पुन्ही जिंकून आलो होतो. तेव्हा काही राजकीय तज्ज्ञांनी सांगितलं होतं की या विजयात काय आहे, हे तर २०१७मधेच निश्चित झालं होतं. कारण २०१७ मध्ये यूपीचा निकाल आला होता. यावेळी हे ज्ञानी असं बोलतील की २०२२ च्या निकालांनी २०२४ चा निकाल निश्चित केलाय.

या निवडणुका तेव्हा झाल्या जेव्हा जगाला कोरोना सारख्या संकटाने वेढलं होतं. संपूर्ण जगाने १०० वर्षात असा आजार नाही पाहिला. त्यातच युद्धाने जगाच्या चिंतेत भर घातली. या परिस्थितीत जगभरातील सप्लाय चेन विस्कळीत झालीये. या आव्हानांना तोंड देण्यासाठी भारताने जे निर्णय घेतले, त्यामुळे भारताला पुढे जाण्यास मदत केलीये. जिथे डबल इंजिनचं सरकार होते, तिथे जनतेच्या हिताची डबल सुरक्षा झाली, विकास कामांची गती वाढली.

जगावर आर्थिक संटक आहे, इंधनाचे भाव युद्धामुळे वाढत आहे, यामध्ये जे बजेट आलं त्याने एक विश्वास दिलाय की भारत आत्मनिर्भर अभियानाच्या मार्गावर पुढे जात आहे. या विपरित वातावरणात भारताच्या जनतेने विशेषकरुन यूपी सारख्या राज्यांनी आपल्या दूरदृष्टीचा परिचय दिलाय.

ऑपरेशन गंगालाही प्रदेशवादात अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला.

मी देशापुढे काही चिंता ठेवू इच्छितो. देशाचा नागरिक देशहितासाठी जबाबदारीने काम करतोय. तो राष्ट्रनिर्माण करण्याचं काम करतोय. पण, काही लोक सतत राजकारणाचा स्तर आणखी कमी करत आहेत. कोरोना काळात नागरिकांना भटकवण्याचा काम केलं. लसीकरणाच्या प्रयत्नांचं जग कौतुक करतंय, पण यावर विरोधकांकडून प्रश्न उपस्थित करण्यात आले. जेव्हा युक्रेनमध्ये आपले हजारो नागरिक आणि विद्यार्थी अडकून पडले होते. तेव्हाही देशाचं खच्चीकरण करण्याच्या गोष्टी होत होत्या. ते तिथे अडकले होते आणि इथे त्यांच्या कुटुंबाची चिंता वाढवण्याचं काम होत होतं. ऑपरेशन गंगालाही प्रदेशवादात अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला.

मी आज पंजाबच्या भाजप कार्यकर्त्यांचं विशेष कौतुक करेन. त्यांनी विपरित परिस्थितीत ज्या पद्धतीने पक्षाची कमान सांभाळली आहे ते येणाऱ्या काळात पंजाबमध्ये भाजपच्या मजबुतीला एक महत्त्वाच्या स्थान ठरेल. असा विश्वास मला आहे. पंजाबमध्ये भाजपा एक शक्तीच्या रुपाने प्रगती करेल, हे मी बघतोय.

Edited By - Nupur Uppal

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com