उत्तर कोरियात दोन वर्षात पहिला कोरोना रुग्ण सापडला; किम जोंगकडून लॉकडाऊनची घोषणा

उत्तर कोरियात कोरोना लसीकरण झालेलं नाही, त्यामुळे तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे.
North Korea Corona News, Corona Latest Marathi News, international news in marathi
North Korea Corona News, Corona Latest Marathi News, international news in marathiSaam Tv
Published On

जग ज्यावेळी कोरोना महामारीशी लढत होतं त्यावेळी उत्तर कोरियात एकही रुग्ण नसल्याचा दावा करण्यात आला होता. पण आता उत्तर कोरियात दोन वर्षात पहिला कोरोना रुग्ण आढळल्याचे समोर आले आहे. यामुळे उत्तर कोरियात संपूर्ण लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. अजुनही उत्तर कोरियात (North Korea) कोरोना लसीकरण झालेलं नाही, त्यामुळे तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. (Corona Latest Marathi News)

उत्तर कोरियाच्या सरकारी वृत्त संस्थांनी याची माहिती दिली आहे. प्योंगयांगमधील लोकांमध्ये कोरोनाचा (Corona) ओमायक्रॉन व्हेरिएंट सापडल्याचे समोर आले आहे. पण अजुनही कोरोना रुग्णांची संख्या अजुनही उघड झालेली नाही.'आमच्या आपत्कालीन क्वारंटाइन फ्रंटमधील उल्लंघनानंतर देशात सर्वात मोठे आपत्कालीन संकट उद्भवले आहे.

हे देखील पाहा

उत्तर कोरियाने North Korea() जानेवारी २०२० मध्येच आपल्या सीमा बंद केल्या होत्या. आतापर्यंत एकही कोरोना रुग्ण या देशामध्ये नव्हता. आता एक रुग्ण पॉझिटिव्ह आला आहे. उत्तर कोरियाने कोरोनावरील लस नाकारली होती, त्यामुळे कोरोनाचा (Corona) मोठा उद्रेक होऊ शकतो असं तज्ज्ञांनी सांगितले होते.

उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांच्या हुकूमशाहीमुळे उत्तर कोरिया एकाकी पडला आहे. उत्तर कोरियात कुपोषणाचे प्रमाणही जास्त आहे. त्यामुळे कोरोनाचे प्रभाव मोठ्या प्रमाणत पडणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. उत्तर कोरियातील लोकांना भूक आणि गरीबीमुळे आत्महत्या करण्यास भाग पाडले गेले असल्याच्या अनेकवेळा बातम्या आल्या आहेत.

Edited By- Santosh Kanmuse

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com