माझ्या शाळेचं नाव आहे..., अखेर सुंदर पिचईंनी सांगितलं शाळेचं नाव!

गुगलचे सीईओ सुंदर पिचाई (Sundar Pichai) यांनी अखरे ते कोणत्या शाळेत शिकले या अफवांना ब्रेक लावला आहे.
Sundar Pichai
Sundar PichaiSaam TV
Published On

गुगलचे सीईओ सुंदर पिचाई (Sundar Pichai) यांनी अखरे ते कोणत्या शाळेत शिकले या अफवांना ब्रेक लावला आहे. नुकतीच पिचाई यांची अल्फाबेट इंकच्या सीईओपदी नियुक्ती करण्यात आली तेव्हा अनेक शैक्षणिक संस्थांनी दावा केला की पिचाई यांनी त्यांच्या शाळेमधून शिक्षण घेतले आहे. ज्या आठवड्यात ते Google CEO झाले त्याच आठवड्यात विकिपीडियावरती जवळपास 350 वेळा त्यांच्या शाळेचे नाव बदलण्यात आले होते. पिचाई हे केवळ एका मोठ्या टेक कंपनीचे सीईओ नाहीत तर त्यांची गणना जगातील 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये केली जाते.

स्टॅनफोर्ड ग्रॅज्युएट स्कूल ऑफ बिझनेसच्या एका मुलाखतीदरम्यान पिचाई यांना त्यांच्या शाळेबद्दल विचारण्यात आले. मुलाखतकाराने त्याच्या विकिपीडियावरती असलेल्या शाळांची यादी त्यांना ऐकवली. त्यावर, पिचाई म्हणाले की विकिपीडियावर दिसणारी दोन नावे बरोबर आहेत. त्यांनी चेन्नईतील वाना वाणी येथे शालेय शिक्षण पूर्ण केले. संबंधित शाळा IIT मद्रासच्या कॅम्पसमध्ये आहे.

Sundar Pichai
रेल्वे रुळावर आढळला RTO अधिकाऱ्याच्या वाहन चालकाचा मृतदेह; पाेलीस तपास सुरु

पिचाई यांनी हे देखील उघड केले की त्यांच्याबद्दल बऱ्याच अफवा होती की ते होमस्कूल आहेत. हा अहवाल त्याच्या विकिपीडियावरती देखील टाकण्यात आला होता. परंतु ही बातमी खरी नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पिचाई यांचे विकिपीडिया पेज आता त्यांच्या भारतातील शाळेशी संबंधित योग्य माहिती दर्शवते.

पिचाई यांनी आपले उच्च शिक्षण प्रतिष्ठित IIT खरगपूरमधून पुर्ण केले आहे. त्यांनी मेटलर्जिकल अभियांत्रिकीमध्ये बीटेक केले आहे. त्यानंतर, ते स्टॅनफोर्ड विद्यापीठात साहित्य, विज्ञान आणि अभियांत्रिकीमध्ये एमएस आणि नंतर पेनसिल्व्हेनिया विद्यापीठाच्या व्हार्टन स्कूलमधून एमबीए करण्यासाठी गेले.

2004 मध्ये, पिचाई यांनी Google Chrome सह Google च्या क्लायंट सॉफ्टवेअर उत्पादनांच्या संचासाठी उत्पादन व्यवस्थापनाचे नेतृत्व केले. त्यांच्या खांद्यावर प्रामुख्याने Google ड्राइव्ह, Chrome OS आणि Google मधील इतरही गोष्टींची जबाबदारी होती. 2013 मध्ये, Android ही आणखी एक प्रमुख गोष्ट होती जी त्यांच्या नेतृत्वाखाली विकसित झाली. सुंदर पिचाई यांनी यापूर्वी अप्लाइड मटेरिअल्स येथे अभियांत्रिकी आणि उत्पादन व्यवस्थापन आणि मॅककिन्से अँड कंपनी येथे व्यवस्थापन सल्लागार म्हणून काम केले आहे.

2015 मध्येच पिचाई यांची Google CEO म्हणून निवड झाली होती. त्यांच्या अगोदर लॅरी पेज हे सीईओ होते. ज्यांनी सेर्गे ब्रिनसह गुगलची स्थापना केली होती. 2019 मध्ये, पिचाई अल्फाबेट इंकचे सीईओ बनले, जी Google ची सिस्टर कंपनी आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com