Farmer Found Diamond : नशिब चमकलं! शेतात सापडला हिरा, शेतकरी रातोरात बनला लखपती

MP News : मध्यप्रदेशच्या पन्ना जिल्ह्यामध्ये एका शेतकऱ्याला शेतामध्ये ४ कॅरेट २४ सेंटचा हिरा सापडला. हा हिरा त्याने हिरा कार्यालयात जमा केला आहे. या हिऱ्याची किंमत २० लाख रुपये असू शकते असा अंदाज वर्तवला जात आहे.
Farmer Found Diamond
Farmer Found DiamondMeta Ai
Published On

Diamond News : शेतामध्ये काम करत असताना एका शेतकऱ्याला मौल्यवान हिरा सापडल्याची घटना मध्यप्रदेशमध्ये घडली आहे. ४.२४ कॅरेटच्या हिऱ्याची किंमत तब्बल २० लाख रुपये असल्याचे म्हटले जात आहे. शेतकऱ्याने हिरा कार्यालयामध्ये हा हिरा जमा केला आहे. लवकरच या हिऱ्यावर बोली लागणार असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेशनच्या पन्ना जिल्ह्यामध्ये ठाकूर प्रसाद या शेतकऱ्याला शेतामध्ये काम करत असताना ४ कॅरेट २४ सेंटचा चकचकीत हिरा सापडला. ते मागील अनेक वर्षांपासून शेतामध्ये काम करत आहेत. अथक प्रयत्नांनंतर यश मिळाले असल्याचे ठाकूर प्रसाद यांनी म्हटले आहे. हिऱ्याच्या मोबदल्यामध्ये मिळणाऱ्या पैशातून कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारुन नवीन काम सुरु करण्याचा त्यांनी निर्धार केला आहे.

हीरा पारखी अनुपम सिंह यांनी या प्रकरणाची माहिती दिली आहे. ठाकूर प्रसाद यांना मिळालेल्या हिरा सरकोहा क्षेत्रात मिळाला आहे. या हिऱ्याची लवकरच बोली लागणार आहे. पन्ना जिल्ह्यामध्ये या आधीही अनेक शेतकऱ्यांना हिरे मिळाले आहेत. या जमिनीमध्ये हिरे असल्याचेही अनुपम सिंह यांनी सांगितले.

Farmer Found Diamond
Viral Video : 'तुझ्या पिरतीचा विंचू मला..' वसंत मोरे थिरकले, 'व्हॅलेंटाईन डे'च्या दिवशी केला तुफान डान्स; पाहा VIDEO

मध्यप्रदेशच्या पन्ना जिल्ह्याला हिऱ्याच्या असंख्य खाणी आहेत. या भूमीवर हिरे सापडत असल्याने येथील लोक रातोरात श्रीमंत झाल्याच्या घटना घडल्या आहेत. मागच्या वर्षी एका शेतकऱ्याला असाच हिरा मिळाला होता. त्या हिऱ्याची बाजारामध्ये बोली लावण्यात आली. तेव्हा बोलीमार्फत हिरा तब्बल ५ कोटी रुपयांना विकला गेला होता.

Farmer Found Diamond
Shivjanmotsav 2025 : शिवनेरीवर रंगणार 'शिवजन्मोत्सव', मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार 'हिंदवी स्वराज्य महोत्सव'चे उद्घाटन

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com