Goa Election: महाराष्ट्रातील सरकारला आम्ही पर्याय देणार; फडणवीसांच वक्तव्य

'मी पहिल्या दिवशीच सांगितलं होतं की शिवसेनेची लढाई आमच्याशी नाही तर NOTA शी आहे'
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSaam TV
Published On

पणजी : आज उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा (Goa), पंजाब आणि मणिपूर या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले असून या सर्व निकालांमध्ये महाराष्ट्रासाठी सर्वाधिक लक्ष लागून असलेली राज्य म्हणजे उत्तर प्रदेश आणि गोवा (Uttar Pradesh and Goa) आणि या दोन्ही राज्यांमध्ये भाजपला बहूमत मिळालं आहे.

गोवा विधानसभा निवडणुकीची जबाबदारी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांभाळली होती आणि याच पार्श्वभूमीवर आज गोव्यातील विजयानंतर फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला असता आपण राज्यातील सरकारला पर्याय देऊ असं वक्तव्य केलं.

Devendra Fadnavis
Congress: 'कार्यकर्त्यांचा भ्रमनिरास आणि नेत्यांच्या अहंकारामुळे काँग्रेसचा पराभव'

ते म्हणाले, महाराष्ट्रात आम्ही २०२४ ची तयारी केलीय. सरकार आम्ही पाडणार नाही. मात्र सरकार पडलं तर त्याला पर्यायी सरकार देऊ, मी पहिल्या दिवशीच सांगितलं होतं की शिवसेनेची लढाई आमच्याशी नाही तर नोटाशी आहे असा टोलाही त्यांनी सेनेला लगावला. २०२४ च्या निवडणुकीनंतर पूर्ण बहुमतानं विजयी होऊ, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

दरम्यान, राष्ट्रवादी (NCP) आणि सेनेची एकत्रित मतं नोटापेक्षा कमी आहेत. तर प्रमोद सावंतांच्या मतदारसंघात जाऊन सेनेनं मोठी सभा घेतली. मात्र तिथे त्यांच्या उमेदवाराला फक्त ९७ मतं मिळाल्याचंही फडणवीसांनी सांगितलं. शिवाय उत्पल पर्रिकर पराभूत झाल्याचा आनंद मी व्यक्त करत नाही. ते आमच्याच परिवारातील आहेत. त्यांनी योग्य निर्णय घेतला असता तर आज ते आमदार असते असंही फडणवीस म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com