
अगदी काहीवेळा अगोदरच मोबाईलचे इंटरनेट बंद पडलंय की काय? असा प्रश्न तुम्हाला पडला असणार. कारण काही वेळापुर्वी तुम्हाला फेसबुक आणि व्हाट्सअॅपचे अपडेट्स येणं बंद झाले असणार. तुम्ही अनेकवेळा प्रयत्न केले असतील मात्र, ते करुन देखील तुम्ही अयशस्वी ठरला असाणार आहे. याचे कारण ही अडचण काही तुमच्या एकट्याला येत नव्हती तर संपूर्ण जगातील फेसबुक संबधित काही अॅप्स बंद पडले होते. यामध्ये प्रामुख्याने फेसबुक, व्हाट्सअॅप आणि इंस्टाग्राम या अॅप्सचा समावेश होता. काल सायंकाळी ९:१५ वाजेच्या सुमारास फेसबूक आणि व्हाट्सअप अॅपप्लिकेशन बंद पडले होते. मात्र आता तब्बल ६ तासानंतर हे अॅप्स परत एकदा सुरु करण्यात आले आहे.
हे देखील पहा-
सुरूवातीला काही काळ पावसामुळे इंटरनेट गेल्याची शंका सर्वाना निर्माण झाली होती. मात्र त्यानंतर फेसबुक आणि व्हाट्सअॅप वगळता सर्व वेबासाईट्स सुरू असल्याचे आढळून आले. यानंतर ट्विटर फेसबुक डाऊन, व्हाट्सअॅप डाऊन असे ट्रेंड देखील सोशल मीडियावर यायला सुरुवात झाली. यापुर्वी देखील अनेक वेळा काही तांत्रिक अडचणींमुळे फेसबूक आणि व्हाट्सअप बंद झाल्याचे दिसून आले होते.
याबाबत फेसबुक-व्हाट्सअप काय म्हणाले?
याविषयी फेसबुकने स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी सांगितले आहे की, आम्हाला माहिती आहे की काही लोकांना आमच्या अॅप्स आणि उत्पादने वापरण्यामध्ये अडचणी येत आहे. आम्ही शक्य तितक्या लवकर गोष्टी पूर्ववत करण्याकरिता काम करत आहोत आणि होत असलेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर व्यक्त करत आहोत.
व्हाट्सऍपने देखील सांगितले आहे की, काहींना सध्या व्हाट्सअॅप वापरण्यामध्ये अडचण येत असल्याचे आम्ही जाणून आहोत. परिस्थिती लवकरात लवकर पूर्ववत होण्याकरिता आम्ही प्रयत्न करत आहोत. याबाबत आम्ही लवकरच माहिती देणार आहे.
सोशल मीडिया ही गोष्ट आता प्रत्येकासाठी खूप अत्यावश्यक झाली आहे. हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म बंद असल्याने अनेकजण हैराण झाले होते. यानंतर आता ट्विटर व्हाट्सअप आणि फेसबूक डाऊनचा हॅशटॅग ट्रेंड झाले होते. त्यानंतर अनेकांनी आपले फेसबुक, व्हाट्सअॅप बंद झाल्याने वेगवेगळे प्रयोग करून सुरू करण्याचा प्रयत्न केले आहे. मात्र नंतर कंपनीकडूनच अडचण असल्याचे समोर दिसून आले आहे.
Edited By- Digambar Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.