Afghanistan News : अफगणिस्तान हादरलं! काबूलमध्ये भीषण स्फोट, ६ जणांचा दुर्दैवी मृत्यू

Afghanistan latest News : अफगणिस्तानची राजधानी काबुलमध्ये भीषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे
Afghanistan latest News
Afghanistan latest NewsANI/twitter
Published On

Afghanistan : अफगणिस्तानची राजधानी काबुलमध्ये भीषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे. काबुलमधील विदेश मंत्रालयाच्या रोडच्या ट्रेड सेंटरजवळ हा बॉम्बस्फोट झाला आहे. या स्फोटात आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू झाला आहे. (Latest Marathi News)

अफगणिस्तानमध्ये (Afghanistan) झालेल्या स्फोटाने काबूल हादरलं आहे. काबूलमध्ये स्फोट झाल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अफगणिस्तानच्या तपासयंत्रणेने स्फोट कसा झाला, याचा शोध सुरू केला आहे. स्फोटाचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

काबूलमध्ये झालेल्या स्फोटाची अद्याप कोणत्याही संघटनेने जबाबदारी घेतलेली नाही. या स्फोटामागे आयएसआयएस-के (ISIS-K) या संघटना आहे,अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

अफगणिस्तानात इस्लामिक स्टेट समूह संघटनेवर नियंत्रण मिळविण्यात अपयश येत असल्याचे दिसून येत आहे. या संघटेनाचा धोका आता केवळ अफगणिस्तानसाठी मर्यादित राहिलेला नसून अमेरिका आणि इतर पाश्चिमात्य देशांना देखील आहे. (Afghanistan News In Marathi)

Afghanistan latest News
Apple Layoffs 2023 : Meta-Google नंतर आता Appleच्या कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात !

दरम्यान, याआधी देखील आयएसआयएस-के या संघटनेने ९ मार्च रोजी २०२३ आत्मघातकी बॉम्ब बनविण्याची जबाबदारी उचलली होती. या आधी यांनी बल्ख प्रातांतील तालिबानचे राज्यपाल मोहम्मद दाऊद मुजम्मिल यांच्यासहित २ लोकांचा मृत्यू झाला होता.

९ मार्च रोजी झालेल्या बॉम्ब स्फोटात इस्लामिक स्टेटच्या तरुणांनी अफगणिस्तानच्या पश्चिम हेरात प्रांतावर हल्ला केला होता. तर १५ मार्च रोजी इस्लामिक स्टेटने ISIS-K च्या पूर्व गड नंगरहारच्या पूर्व प्रांतातील एका तालिबान जिल्ह्याचे राज्यपालावर देखील हल्ला केला होता. मात्र, त्यांना यश आलं नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com