Ukraine Crisis: नको तिथं पब्लिसिटी! एअरलिफ्ट केलेल्या विद्यार्थ्यांना द्यायला सांगितल्या 'मोदीजी जिंदाबाद'च्या घोषणा... (पहा Video)

Ukraine Crisis Viral Video: केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट (Ajay Bhatt) हे युक्रेनमधून सोडवण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना मोदींची जयघोष करण्यास सांगत आहेत.
Everywhere publicity! minister ajay bhatt says modi ji zindabad ukraine evacuated students in iaf plane
Everywhere publicity! minister ajay bhatt says modi ji zindabad ukraine evacuated students in iaf planeTwitter/ANI
Published On

Ukraine Crisis: पब्लिसिटी कुठे करावी आणि कुठे नाही याचं भान न राखणं हे सध्या मोदींच्या मंत्र्यांना चांगलचं भोवलयं. युक्रेनमध्ये (Ukraine Crisis) अडकलेल्या भारतीयांना सोडवल्यानंतर त्यांच्याकडून काही मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा (PM Modi) जय-जयकार करवून घेतला. याबाबतचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. यात केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट (Ajay Bhatt) हे युक्रेनमधून सोडवण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना मोदींची जयघोष (Cheers) करण्यास सांगत आहे, मात्र विद्यार्थ्यांनी यावेळी चुप्पी साधली आणि मंत्री महोदयांची नाचक्की झाली. (Everywhere publicity! minister ajay bhatt says modi ji zindabad ukraine evacuated students in iaf plane)

हे देखील पहा -

नेमकं काय झालं?

रोमानियामधील बुखारेस्ट आणि हंगेरीतील बुडापेस्ट येथून 210 प्रवाशांना घेऊन जाणारी दोन सी-17 वाहतूक विमानं आज सकाळी हिंडनमध्ये उतरली. युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या एका समूहाला दिल्लीच्या हिंडन एअरबेसवर आणलं गेलं. त्यानंतर केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट विद्यार्थ्यांना संबोधित करत होते. भारतीय हवाई दलाच्या (AIF) विमानालाच मंत्री महोदयांनी राजकारणाचं व्यासपीठ समजून आश्वासानं द्यायला सुरुवात केली. मंत्री महोदय म्हणाले की, विद्यार्थ्यांनो अजिबात काळजी करू नका. तुमचा जीव वाचला आहे. सगळं काही व्यवस्थित होईल, असं म्हणत त्यांनी भारत माता की जय आणि आदरणीय मोदी जी जिंदाबाद अशा घोषणा दिल्या. भारत माता की जय, या घोषणेला सर्व विद्यार्थ्यांनी एकसुरात साथ देत घोषणा दिल्या. मात्र जसं 'मोदीजी जिंदाबाद' अशी घोषणा मंत्र्यांनी दिली, तेव्हा विद्यार्थी बुचकळ्यात पडले आणि शांत झाले. काही विद्यार्थ्यांनी मात्र संभ्रमात आणि हळू आवाजात घोषणा दिल्या. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून यामुळे सरकावर चांगलीच टिका होतेय.

कॉंग्रेसची टिका -

याबाबत कॉंग्रेसनं (Congress) टिका केली की, युक्रेनमधील भारतीय विद्यार्थी धोक्यात आहेत, परंतु केंद्र सरकार ही ‘पीआर एजन्सी’ बनलीये. शुक्रवारी आणखी एका भारतीय विद्यार्थ्याला गोळी लागण्याच्या घटनेवरून काँग्रेसने सरकारला फटकारले. पक्षाचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विट केले, "आणखी एका भारतीय विद्यार्थ्याला गोळी लागली... युक्रेन-रशिया युद्धात प्रत्येक क्षणी मुले धोक्यात आहेत. पण मोदी सरकार केवळ पीआर एजन्सी बनून राहिली आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com