Interest on PF : साडेसहा कोटी खातेधारकांसाठी खूषखबर; 'EPFO' देणार मोठं गिफ्ट

EPFO latest news in Marathi, PF Latest News, PF Updates
EPFO latest news in Marathi, PF Latest News, PF Updates google

नवी दिल्ली : गेल्या काही दशकांपासून प्रोव्हिडंट फंडाचा (Provident fund interest) व्याजदर खूपच कमी आहे. परंतु, EPFO ने आपल्या प्रोव्हिडंट फंडच्या खातेदारकांसाठी २०२१-२२ साठी पीएफचं व्याजदर ८.१ टक्के केलं आहे. हा पीएफचा व्याजदर १९७७-७८ नंतरचा सर्वात कमी व्याजदर आहे. यापूर्वी २०२०-२१ मध्ये प्रोव्हिडंट फंडावर ८.५ टक्के व्याजदर (PF Interest Rate) मिळत होता. मात्र, आता EPFO कडून खासगी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कोट्यावधी कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट मिळणार आहे. खातेधारकांना लवकरच प्रोव्हिडंट फंडाचा व्याज मिळण्याची शक्यता आहे. याबाबतची प्रकिया पूर्ण झाली असून आता फक्त वित्त मंत्रालयाच्या (Finance Ministry) अनुमतीची प्रतीक्षा आहे. त्यानंतर EPFO च्या सदस्यांच्या पीएच्या खात्यात कधीही व्याज जमा केलं जाऊ शकतं. (EPFO latest news in Marathi)

EPFO latest news in Marathi, PF Latest News, PF Updates
'या' कंपनीची मोठी घोषणा! कर्मचाऱ्यांना देणार आठवड्यातून 3 दिवस सुट्या...

'EPFO' च्या सहा कोटींहून अधिक खातेधारकांना होणार फायदा

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारकडून प्रोव्हीडंट फंडच्या खातेधारकांना ३० जूनच्या आधी त्यांच्या खात्यावर पैसे ट्रान्सफर केले जावू शकतात. मात्र, EPFOने याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केली नाहीय. सरकारनेही याबाबत अधिकृतरित्या माहिती दिलेली नाही. जसंकी आता पीएफचा व्याजदर निश्चित झाल्याने खातेधारकांना पीएफचा व्याज बॅंकेत जमा होण्याची आशा लागली आहे. त्यामुळे EPFO च्या सहा कोटींहून अधिक खातेधारकांना याचा फायदा होणार आहे.

गेल्या काही वर्षांत पीएफवर मिळायचा एवढा व्याज

गेल्या काही दशकांपासून प्रोव्हीडंट फंडावर मिळणारा व्याजदर खूपच कमी आहे. EPFO ने २०२१-२२ साठी पीएफचा व्याजदर ८.१ टक्का एवढा केला आहे. १९७७-१८ नंतरचा हा प्रोव्हीडंट फंडावरचा सर्वात कमी व्याजदर आहे. यापूर्वी २०२०-२१ मध्ये ८.५ टक्के एवढा व्याजदर पीएफवर मिळत होता. तसंच एक वर्षापूर्वी २०१९-२० मध्ये ८.६५ टक्के मिळणारा व्याजदर कमी करुन ८.५ टक्क्यांपर्यंत निश्चित केला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com