Employee Salary : कंपनीची अजब ऑफर! कर्मचाऱ्यांना देणार 1 वर्षाचा पूर्ण पगार, पण ठेवली ही अट

Google, Amazon layoff : काही दिग्गज टेक कंपन्याना युरोपियन देशांमध्ये लोकांना काढून टाकण्यासाठी खूप संघर्ष करवा लागत आहे.
Employee Salary
Employee Salarysaam tv
Published On

Google Employee : जगतिक स्तरावर सध्या अनेक मोठ्या कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांची कपात केली जात आहे. यात अनेक दिग्गज टेक कंपन्यांचा देखील समावेश आहेत. Layoffs.fyi या वेबसाइटनुसार गुगल, मेटा आणि अॅमेझॉन सारख्या मोठ्या कंपन्यांससह जगभरात 570 मोठ्या टेक कंपन्यांनी या वर्षात आतापर्यंत 1 लाख 68 हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आहे. परंतु दिग्गज टेक कंपन्यांना युरोपियन देशांमध्ये कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यासाठी खूप संघर्ष करवा लागत आहे.

काही युरोपीय देशांमध्ये कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यासाठी काही नियम आहे. या देशांमध्ये कंपन्या "जागतिक स्तरावर कर्मचारी हित" या विषयावर चर्चा केल्याशिवाय कर्मचार्यांना काढून टाकू शकत नाहीत. या कायद्यानुसार कंपन्यांना कर्मचाऱ्यांना काढण्यापूर्वी या कौन्सिलशी सल्लामसलत करणे कायदेशीररित्या आवश्यक आहे. यात डेटा संकलन, चर्चा आणि अपील करण्याच्या पर्यायाची संभाव्य वेळखाऊ प्रक्रियेचा समावेश आहे.

Employee Salary
Rozgar Mela: मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी 71 हजार तरुणांना देणार नियुक्तीपत्र

याच कारणामुळे गुगल फ्रान्स आणि जर्मनीमधील या समुहांकडे कर्मचाऱ्यांची कपात करण्याची समस्या सोडवण्यासाठी मदत घेत आहे. Google ची मूळ कंपनी अल्फाबेटने कथितरित्या कर्मचाऱ्यांना स्वेच्छेने राजीनामा देण्यास आणि त्या बदल्यात फ्रान्समध्ये चांगले पॅकेज प्राप्त करण्याची ऑफर दिली आहे. याशिवाय अॅमेझॉन स्वेच्छेने राजीनामा दिल्याबद्दल 5 ते 8 वर्षांचा अनुभव असलेल्या काही वरिष्ठ व्यवस्थापकांना एक वर्षाचे वेतन देण्याची ऑफर दिली ​​आहे.

Employee Salary
Monsoon 2023 IMD Forecast: शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! यंदा देशात मान्सून सामान्य, सरासरीच्या 96 टक्के पाऊस पडणार!

दिग्गज टेक कंपनी गुगल देखील यूकेमधील आपल्या 500 कर्मचाऱ्यांची कपात करण्याचा विचार करत आहे. या कर्मचाऱ्यांना गोपनीय पॅकेज दिले जातील. मागील आठवड्यात Amazon.com ने त्यांच्या व्हिडिओ-गेम विभागातील जवळपास 100 कर्मचाऱ्यांना व्यापक कटबॅकचा भाग म्हणून कामावरून काढून टाकले. गुगल आणि अॅमेझॉनशिवाय इतरही अनेक कंपन्या कर्मचाऱ्यांना स्वेच्छा राजीनाम्यावर बोनस ऑफर करत आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com