Twitter : इलॉन मस्कच्या अल्टिमेटमचा ट्विटरला मोठा धक्का! शेकडो कर्मचाऱ्यांनी स्वतःहून दिले राजीनामे

कर्मचाऱ्यांना आता ठरवायचं आहे की, त्यांना कंपनीसाठी अत्यंत खडतर परिश्रम करत काम करायचं आहे की, राजीनामा द्यायचा आहे.
Elon Musk
Elon MuskSaam Tv
Published On

Elon Musk Twitter : इलॉन मस्कचे ट्विटरमध्ये प्रवेश झाल्यापासून कंपनीमध्ये बरेच बदल झाले आहेत. इलॉन मस्क आपल्या धोरणांसह ट्विटर पूर्णपणे बदलण्यात गुंतले आहेत आणि त्याचा थेट परिणाम कर्मचाऱ्यांवर होत आहे. इलॉन मस्कच्या (Elon Musk) अल्टिमेटमनंतर आता शेकडो कर्मचाऱ्यांनी स्वतःहून राजीनामे दिले आहेत अशी माहिती समोर येत आहे. यामुळे ट्विटरला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.

Elon Musk
Ulhasnagar : महापालिकेकडून 'पडीक' वाहनांवर कारवाई सुरू; वाहन मालकांना ४८ तासांची मुदत

राजीनाम्याच्या या सत्रानंतर मस्क यांनी ट्विटरच्या (Twitter) कर्मचाऱ्यांना अल्टिमेटम दिला आहे. कर्मचाऱ्यांना आता ठरवायचं आहे की, त्यांना कंपनीसाठी अत्यंत खडतर परिश्रम करत काम करायचं आहे की, राजीनामा द्यायचा आहे. मस्क यांनी कर्मचाऱ्यांना ईमेलद्वारे नव्याने जारी केलेल्या प्रतिज्ञापत्रावर त्यांची सहमती दर्शवण्यास सांगितली आहे. या ईमेलचा कर्मचाऱ्यांवर अत्यंत नकारात्मक परिणाम झाल्याचे मानले जात आहे.

इलॉन मस्क यांनी ट्विटरबाबत आपली धोरणे आधीच स्पष्ट केली आहेत. ट्विटरमध्ये अनेक कर्मचाऱ्यांची गरज नव्हती, ज्यांना काढून टाकण्यात आले आहे, असे त्यांचे मत आहे. इलॉन मस्क ट्विटरवर येताच सीईओ पराग अग्रवाल यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. यानंतर त्यांनी कंपनीत मोठ्या प्रमाणावर छाटणीची प्रक्रिया सुरू केली. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, ज्या कर्मचाऱ्यांनी व्यवस्थापनाच्या निर्णयावर टीका केली होती, त्यांनाही काढून टाकण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com