'तू तू मैं मैं'... एलॉन मस्क आणि ट्विटरचे माजी सीईओ यांच्यात टिवटिव, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

ट्विटरच्या माजी सीईओने एलॉन मस्क यांच्या वागणुकीवर निशाणा साधत थेट 'गुंडगिरी म्हणजे नेतृत्व नाही.' असं म्हटलं आहे.
Elon musk
Elon musksaam tv

जगातील सर्वात लोकप्रिय मायक्रो ब्लॉगिंग सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर आता लवकरच अब्जाधीश एलॉन मस्क (Elon Musk) यांच्या मालकीची होणार आहे. ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल (Parag Agrawal) यांनी पाच महिन्यांपुर्वीच ट्विटरवची कमान सांभाळली होती. मात्र, आता पराग अग्रवाल यांना ट्विटरच्या (Twitter) सीईओ (CEO) पदावरुन हटवले जाऊ शकते अशा चर्चांना उधाण आलं आहे. एलॉन मस्कने ट्विटर हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म विकत घेतले आहे. त्याने ट्विटरला ४४ अब्ज डॉलर्समध्ये विकत घेण्याचा करार केला आहे. ट्विटर या प्लॅटफॉर्मची पूर्णपणे मालकीहक्क इलॉन मस्क यांच्याकडे जाण्यास वेळ लागेल. दरम्यान, एलॉन मस्क केवळ ट्विटर खरेदी करण्याबाबतच नाही तर धोरण आणि इतर गोष्टींबाबतही चर्चेत आहेत.अलीकडेच ट्विटरचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) डिक कोस्टोलो (Dick Costolo) यांनीही ऍलॉन मस्क यांच्यावर निशाणा साधला आहे. ट्विटरच्या माजी सीईओने एलॉन मस्क यांच्या वागणुकीवर निशाणा साधत थेट 'गुंडगिरी म्हणजे नेतृत्व नाही.' असं म्हटलं आहे.

एलॉन मस्क काय म्हणाले?
यावर प्रत्युत्तर देताना एलॉन मस्कने ट्विटरवर (Twitter) लिहिले, 'तुम्ही कशाबद्दल बोलत आहात? मला एवढेच म्हणायचे आहे की, ट्विटर राजकीयदृष्ट्या तटस्थ असले पाहिजे.

कुठे सुरु झाला वाद ?
वास्तविक, मस्कच्या प्रवेशानंतर जुन्या धोरणांवरून (Policy) या वादास सुरुवात झाली. मस्क यांनी ट्विटरच्या पॉलिसी हेड विजया गाड्डे यांना फटकारले होते.त्यावेळी टीम मीटिंगमध्ये विजया भावूक झाल्या आणि रडू लागल्या. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (joe biden) यांचा मुलगा हंटर बायडन यांच्यावरील बनवलेल्या विशेष अहवालावर एलॉन यांनी नाराजी व्यक्त केली होती.

हंटर बायडनच्या लॅपटॉपबाबत केलेल्या बातमीमुळे ट्विटरने न्यूयॉर्क पोस्टचे अकाउंट सस्पेंड केले. या निर्णयामागे विजया गाड्डे यांचा हात असल्याचे मानले जात असून एलॉन मस्क यांनीही यासाठी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

माजी सीईओचे म्हणणे काय आहे?
विजया गाड्डे यांच्या बाबतीत, डिक कॉस्टोलो यांनी लिहिले, 'काय होत आहे? तुम्ही खरेदी केलेल्या कंपनीच्या एक्झिक्युटिव्हला तुम्ही त्रास देत आहात आणि धमकावत आहात.

वास्तविक, विजया गाड्डे या कंपनीच्या पॉलिसी हेड आहेत आणि कंपनीच्या प्रत्येक मोठ्या निर्णयाला त्यांना जबाबदार मानले जाते. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अकाउंटवरर बंदी घालण्याचा निर्णयही विजयाचाच होता. मस्कला ट्विटरला मुक्त भाषणासाठी व्यासपीठ बनवायचे आहे. हे व्यासपीठ राजकीयदृष्ट्या तटस्थ असले पाहिजे, असे त्यांचे म्हणणे आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com