नवी दिल्ली - जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले टेस्लाचे प्रमुख एलॉन मस्क यांनी अखेर ट्विटर विकत घेतले आहे. या कराराची माहिती कंपनीकडून देण्यात आली. कंपनीने सांगितले की, हा करार 44 बिलियन अमेरिकन डॉलर्स म्हणजेच सुमारे 3368 अब्ज रुपयांमध्ये झाला आहे. ट्विटर खरेदीसाठी आवश्यक असलेला निधी सुरक्षित करत असल्याचे मस्क यांनी नुकतेच सांगितले होते. ट्विटरनं हा व्यवहार पक्का केला असून यावर्षीच ही डील पूर्ण होईल. त्यामुळे आता ट्विटर एक प्रायव्हेट कंपनी असेल ज्याचे मालक एलॉन मस्क असणार आहेत. (Elon Musk acquires twitter)
गेल्या काही दिवसांपासून एलॉन मस्कच्या ऑफरवरून ट्विटरच्या बोर्डमध्ये चर्चा सुरू होती. नागरिकांना आपले मत स्वतंत्रपणे मांडता यावे यासाठी ट्विटरला खाजगी केले पाहिजे, असे मस्क यांचे म्हणणे आहे, आणि त्यामुळे त्यांनी ट्विटर विकत घेण्याचा निर्णय घेतला. ट्विटरमधील 9% स्टॉक विकत घेतल्यानंतर काही दिवसांनी, मुक्त मतांसाठी Twitter खाजगी असणे आवश्यक आहे, असे एलॉन मस्क यांनी म्हटले होते. मस्क यांचे Twitter Inc मध्ये 100% स्टॉक असेल. त्यांनी ट्विटर प्रति शेअर 54.20 डॉलर (जवळपास 4148 रुपये) या दराने विकत घेतले आहे.
ट्विटर खरेदी केल्यानंतर एलॉन मस्क यांचे पहिलं ट्विट
एलॉन मस्क यांनी या ट्विटमध्ये म्हंटल आहे की, "लोकशाहीसाठी फ्रीडम ऑफ स्पीच अतिशय महत्वाचं आहे. पण ट्विटर या तत्त्वाचं काटेकोरपणं पालन करतं का?", असा प्रश्न युझर्सना विचारला होता. मस्क यांनी एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सुरू करण्याचा विचार केला होता. जिथं यूझर्स त्यांना हवं ते लिहू शकतात. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांचे सोशल प्लॅटफॉर्म- सोशल ट्रुथ लॉन्च करण्यामागील कारण देखील तेच आहे. हे गेल्या महिन्यात iOS वापरकर्त्यांसाठी लाँच करण्यात आले होतं. हे सध्या अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठीही उपलब्ध करून देण्यात आलं आहे. ट्विटर, फेसबुक आणि इतर अनेक सोशल एप्सनं बंदी घातल्यानंतर ट्रम्प यांनी स्वतःचं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सुरू करण्याचा निर्णय घेतला होता.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.