Assembly Election Result 2022: तीन राज्यातील मुख्यमंत्री पिछाडीवर

पंजाबमध्ये आम आदची पक्ष आघाडीवर आहे.
Assembly Election Result 2022
Assembly Election Result 2022Saam TV
Published On

पाच राज्यातील निवडणुकांची मतमोजणी सुरु आहे. चार राज्यात भाजपने आघाडी घेतली आहे. तर पंजाबमध्ये काँग्रेसकडून सत्ता जाण्याच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने पहिल्यांदाच आघाडी घेतली आहे. तर उत्तर प्रदेशमध्ये भाजपने आघाडी घेतली असून सत्तेच्या दिशेने वा़चाल सुरु आहे. उत्तर प्रदेशमधील दोन नंबरच्या पक्षासाठी सपाची घौडदौड सुरु आहे. या निकालात महत्वाचं म्हणजे तीन राज्यातील मुख्यमंत्री पिछाडीवर आहेत.

गोव्यातही भाजप आघाडीवर आहे. पण गोव्याचे मुख्यमंत्री सुरुवातीपासून पिछाडीवर होते. पंजाब मध्येही हीच परिस्थिती आहे. पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी पिछाडीवर आहेत. कॅप्टन अमरिंदर सिंगही पिछाडीवर आहेत. तर पंजाबमध्ये नवज्योतसिंग सिद्धू पिछाडीवर आहे. पंजाब सत्तांतरच्या वाटेवर आहे. .

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी हे खतिमा मतदारसंघातून पिछाडीवर आहेत. उत्तराखंडमध्ये भाजप आघाडीवर आहे. भाजप 42 जागांवर आघाडीवर आहे.

Edited by- Santosh kanmuse

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com