Indigo Filght : धक्कादायक! मद्यपीचा विमानात धिंगाणा, प्रताप असा की खावी लागली जेलची हवा

Delhi News : दिल्लीहून बंगळुरूला जाणााऱ्या विमानात ही घटना घडली आहे.
Indigo Filght News
Indigo Filght NewsSaam Tv
Published On

Delhi Indigo Flight News : गेल्या काही दिवसात विमानांमध्ये प्रवाशांकडून गैरवर्तनाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. प्रशासनाने याची दखल घेत कडक पावलं उचलली. मात्र आता पुन्हा एकदा विमानप्रवासात मद्यधुंद तरुणानं धिंगाणा घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.इंडिगो विमानामध्ये एक प्रवाशाने मद्यधुंद अवस्थेत असा काहीस प्रकार केला ज्यामुळे सर्वांनाच धक्का बसला. दिल्लीहून बंगळुरूला जाणााऱ्या विमानात ही घटना घडली आहे.(Latest Marathi News)

Indigo Filght News
Nandurbar Fire News : थुवनीत घराला भीषण आग; आदिवासी शेतकऱ्याचा टेकडीवरील उभा संसार जळून खाक

मिळालेल्या माहितीनुसार, मद्यधुंद अवस्थेत या व्यक्तीने फ्लाइटचा इमर्जन्सी दरवाजा फ्लॅप उघडण्याचा प्रयत्न केला. शुक्रवारी (७ एप्रिल) सकाळी ७.५६ वाजता दिल्ली विमानतळावरून उड्डाण घेणाऱ्या इंडिगोच्या विमानात ही घटना घडली. बेंगळुरूला पोहोचताना या प्रवाशाला CISF च्या ताब्यात देण्यात आलं. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

इंडिगो (Indigo) एअरलाइन्सने जारी केलेल्या निवेदनात असे सांगण्यात आले की विमान 6E 308 दिल्लीहून (Delhi) बंगळुरूला जात असताना त्यामध्ये प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने मद्यधुंद अवस्थेत आपत्कालीन दरवाजाचा फ्लॅप उघडण्याचा प्रयत्न केला.

मद्यधुंद प्रवाशाचं वर्तन पाहून क्रू मेंबर आणि वैमानिक सर्तक झाले. त्यांनी प्रवाशाला वॉर्निंग दिली. त्यानंतर विमान बंगळुरूला सुरक्षित लॅण्ड करण्यात आल्यानंतर त्याला सीआयएसएफच्या ताब्यात देण्यात आलं आहे. गेल्या काही महिन्यांपासून विमानात असभ्य वर्तनाच्या घटना वारंवार समोर येत आहेत.

Indigo Filght News
Mumbai Crime News : ऑर्डर वेळेवर न आल्याच्या रागातून बारबाहेर वाद, वेटर्सकडून ग्राहकाला मारहाण; दहिसर येथील घटना

मद्यधुंद प्रवाशाने केबिन क्रूची छेड काढली

इंडिगोमध्ये अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत. यापूर्वी 1 एप्रिल रोजी बँकॉकहून मुंबईला जाणाऱ्या इंडिगो एअरलाइन्सच्या फ्लाइटमध्ये एका 62 वर्षीय स्वीडिश नागरिकाने मद्यधुंद अवस्थेत 24 वर्षीय केबिन क्रूचा छेड काढली होती. एवढेच नाही तर त्याने सहप्रवाशाला मारहाण करून फ्लाइटमध्ये चांगलाच गोंधळ घातला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com