Uttar Pradesh News: चालत्या बसमध्ये वाहनचालकाला हृदयविकाचा झटका; रिक्षा, दुचाकी चिरडल्याने २ ठार तर ६ जण जखमी

रुग्णालयात दाखल केले असता हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
Uttar Pradesh News
Uttar Pradesh NewsSaam TV

Uttrapradesh News: उत्तरप्रदेशच्या जबलपूरमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका मेट्रो बसचालकाला अचानक हृदयविकाराचा झटका आला. यावेळी प्रवाशांनी भरलेल्या बसने रस्त्यावर असलेल्या इतर वाहनांना चिरडले. यात २ जण ठार तर ६ जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. शुक्रवारी सकाळी ११ च्या सुमारात ही घटना घडली. यात बसचालकाचा मृत्यू झाला आहे. (Latest Marathi News)

कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीत ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी मेट्रो बसचालक सीटवर बेशुद्ध अवस्थेत होता. त्याला रुग्णालयात दाखल केले असता हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पोलीस येण्याआधीच रस्त्यावरील इतर नागरिकांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले होते.

Uttar Pradesh News
Viral Video : शिक्षिकेने वर्गात 'पतली कमरीया...' गाण्यावर लगावले ठुमके; मॅडमच्या अदापाहून विद्यार्थ्यांनी धरला ताल

या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. तर इतर जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अशात या घटनेची चित्तथरारक दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत.

सीसीटीव्हीचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यात तुम्ही पाहू शकता की, रस्त्यावर एक बस वाहनचालकाचे नियंत्रण सुटल्याने सरळ पुढे येते आणि रस्त्यावर असलेली दुचाकी, रिक्षा बस खाली चिरडल्या जातात. या धक्कादायक अपघाताने परिसरात शोकाकुल वातावरण पसरले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com