नवी दिल्ली : प्रेषित पैगंबर मोहम्मद (prophet muhammad) यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर नुपूर शर्मा आणि नवीन कुमार जिंदल अडचणीत सापडले आहेत. भाजपने या दोघांचीही पक्षातून हकालपट्टी केली. त्यानंतर राजकीय वातावरण तापलं. याच पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी चिथावणीखोर वक्तव्य करुन सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली आहे. एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी (asaduddin owaisi) आणि स्वामी नरसिंहानंद यांच्यावर दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
सोशल मीडियावर सामाजिक तेढ निर्माण करणे आणि चितावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी असदुद्दीन ओवेसी आणि नरसिंहानंद (swami yati narasimhananda) यांच्यावर दिल्ली पोलिसांनी कारवाई केली आहे. दरम्यान, यापूर्वीही दिल्ली पोलिसांनी नुपूर शर्मा आणि नविन जिंदल यांच्यासह ९ जणांवर गुन्हा दाखल केला होता.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रक्षोक्षक वक्तव्य करुन समाजात अशांतता पसरवण्याच्या प्रयत्न करणाऱ्यांना पोलीसी खाक्या दाखवल्या जाणार आहेत. नुपूर शर्मा आणि नवीन जिंदल यांच्यावर कारवाई केल्यानंतर आता असदुद्दीन ओवेसी आणि स्वामी नरसिंहानंद यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून सामाजिक तेढ निर्माण करणे, खोट्या बातम्या प्रसारित करणे, तसेच धार्मिक भावना दुखावण्याच्या आरोपाखाली पोलिसांनी संबंधित नेत्यांवर कारवाई केली आहे.
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एफआयआर मध्ये नुपूर शर्मा, नवीन कुमार जिंदल, शादाब चौहान, सबा नकवी, मौलाना मुफ्ती नदीम,अब्दुल रहमान, गुलजार अंसारी,अनिल कुमार मीणा आणि पूजा शकुन यांच्या नावांचा समावेश आहे. आयएफएसओचे पोलीस उपायुक्त के पी एस मल्होत्रा यांनी सांगितलं की, वेगवेगळ्या धर्माच्या लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
असदुद्दीन ओवेसी यांनी दिली प्रतिक्रिया
"हे पहिलं फआयआर आहे ज्यामध्ये गुन्हा काय आहे, हेच कळत नाहीये. जर खुनाच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला गेला आणि खून करताना कोणतं हत्यार वापरलं, याची माहिती पोलिसांनी नाही दिली. तर याला काय म्हणायचं. असंच माझ्याबद्दल घडलं आहे. माझ्या कोणत्या वक्तव्यामुळं गुन्हा दाखल करण्यात आला आहे, हेच समजत नाहिये. दिल्ली पोलीस समतोल वादाने ग्रासली आहे. दोन्ही बाजूंनी प्रक्षोभक वक्तव्य केल्याचं दाखवलं जात आहे. एका पक्षाने खुलेआम प्रेषित पैगंबर मोहम्मद यांचा अवमान केला आहे. मात्र, दुसऱ्या पक्षांना जाणूनबुजून लक्ष्य केलं जात आहे, ज्यामुळे भाजपच्या समर्थकांना खूश करण्याचा प्रयत्न केला जात आहे."
Edited By - Naresh Shende
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.