आर्मी बेसजवळ भाजी विकणारा निघाला पाकिस्तानच्या ISIचा एजंट

भारतातील गोपनीय माहिती, भारतीय लष्कराचे काही महत्त्वाचे नकाशे व कागदपत्रे पाकिस्तानला पुरवल्याच्या आरोपावरून त्याला अटक करण्यात आली.
आर्मी बेसजवळ भाजी विकणारा निघाला पाकिस्तानच्या ISIचा एजंट
आर्मी बेसजवळ भाजी विकणारा निघाला पाकिस्तानच्या ISIचा एजंटsaam tv
Published On

विहंग ठाकूर

राजस्थान : राजस्थानच्या (Rajsthan) पोखरणमधील (Pokharan) आर्मी बेसवळील भागातून (Army Base) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पोखरणच्या आर्मी बेसपाशी भाजी विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या एका पाकिस्तानच्या आयएसआय (Pakistan ISI Agent) चा एजंटला दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हबीबूर रहमान (Habibur Rehman) असं या व्यक्तीचं नाव आहे. भारतातील गोपनीय माहिती, भारतीय लष्कराचे काही महत्त्वाचे नकाशे व कागदपत्रे पाकिस्तानला पुरवल्याच्या आरोपावरून त्याला अटक करण्यात आली. (Delhi police arrest Pakistani ISI agent for selling vegetables near army base)

आर्मी बेसजवळ भाजी विकणारा निघाला पाकिस्तानच्या ISIचा एजंट
सेल्फी घेणे पडले जिवाशी; वीज कोसळून 11 जणांचा मृत्यू

रहमान पाकिस्तानला जाऊन आला असून तो पुर्वीपासून ISI साठी काम करत होता. असे  पोलिसांनी सांगितले. रहमानकडून काही गोपनीय कागदपत्रे आणि भारतीय लष्कराच्या योजनांच्या संबंधित काही नकाशे ताब्यात घेण्यात आले. रहमानने दिलेल्या, ही गोपनीय माहिती व कागदपत्रे त्याला आग्रा येथे लष्करी सेवेत असलेल्या परमजीत कौरने दिली. त्यानुसार आता दिल्ली पोलिस हबीबूरची तर लष्करी अधिकारी परमजीत कौरची चौकशी करत आहेत.

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रहमान पोखरण आर्मी बेसच्या आसपास भाजी विकण्याचे काम करायचा. त्याच्याकडे काही वर्षांपासून आर्मी बेसमध्ये भाजी पोहोचवण्याचे कंत्राटही दिले होते. परमजीत कडून मिळालेली कागदपत्रे तो कमाल नावाच्या माणसाला देणार होता. मात्र पोलीसांना याची माहिती मिळताच त्यांनी रहमानला ताब्यात घेतले. तसेच, त्याच्याशी संबंधित संशयितांचीही धरपकड सुरु केली.

Edited By- Anuradha

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com