Delhi News : दिल्ली हादरली! तिसरीतील मुलीवर शाळेतच अत्याचार; सफाई कर्मचाऱ्याचं लज्जास्पद कृत्य

श्रद्धा वालकर हत्या प्रकरण ताजे असताना राजधानी दिल्ली आणखी एका घटनेने हादरली आहे.
Delhi Crime News
Delhi Crime NewsSaam TV

शिवाजी काळे

Delhi Crime News : श्रद्धा वालकर हत्या प्रकरण ताजे असताना राजधानी दिल्ली आणखी एका घटनेने हादरली आहे. राजधानी दिल्लीत इयत्ता तिसरीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. दिल्लीतील एका शाळेत हा संतापजनक प्रकार घडला आहे. या घटनेने दिल्लीत एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News )

Delhi Crime News
Shraddha Walker Case : घटनेबद्दल आठवणे कठीण झालंय, कोर्टात कबुली देतानाच आफताब काय काय म्हणाला? वाचा

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीत श्रद्धा वालकर हत्या प्रकरणानंतर आणखी एक संतापजनक घटना घडल्याने महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. राजधानी दिल्लीत इयत्ता शिकणाऱ्या विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण केल्याची घटना घडली आहे. दक्षिण दिल्लीतील (Delhi) कालका पब्लिक स्कूलमधील ही घटना घडली आहे. इयत्ता तिसरीमधील विद्यार्थिनीसोबत संतापजनक प्रकार घडला आहे. पीडित विद्यार्थिनीवर सफाई कामगाराने लैंगिक शोषण केल्याचे समोर आले आहे.

पोलिसांनी विद्यार्थिनीवर अत्याचार करणाऱ्या सफाई कामगाराला अटक केली आहे. आरोपीच्या विरोधात पोक्सो अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. सध्या या प्रकरणाची संपूर्ण माहिती समोर आलेली नाही.

Delhi Crime News
Shraddha Walker : श्रद्धा प्रकरणातील सर्वात मोठी अपडेट; आफताबचं नवीन CCTV फुटेज समोर, पाहा VIDEO

दरम्यान, दिल्लीत याआधीही शाळेत विद्यार्थिनीवर अत्याचाराची घटना घडली होती.ऑक्टोबर महिन्यात ११ वर्षीय विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता पुन्हा एकादा शाळेत विद्यार्थिनीवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे सातत्याने महिला अत्याचाराच्या घटना घडू लागल्याने दिल्लीत महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com